IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसी (IRCTC) ने पर्यटकांसाठी गोवा टूर पॅकेज आणले आहे. 'देखो अपना देश' अंतर्गत हे टूर पॅकेज आणण्यात आले आहे.
IRCTC Goa Tour Package
IRCTC Goa Tour PackageDainik Gomantak

IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसी (IRCTC) ने खास तुमच्यासाठी गोवा टूर पॅकेज आणले आहे. 'देखो अपना देश' अंतर्गत हे टूर पॅकेज आणण्यात आले आहे. आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज हैदराबादपासून सुरु होणार आहे. गोवा (Goa) टूर पॅकेज तीन रात्री आणि 4 दिवसांचे आहे. या पॅकेजमध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील प्रेक्षणीय ठिकाणे समाविष्ट आहेत. कोलवा, कांदोळी, मिरामार, अंजुना आणि वार्का हे बीच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आयआरसीटीसी देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी टूर पॅकेजेस ऑफर करत आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटक स्वस्तात आणि सोयीनुसार प्रवास करतात. IRCTC च्या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि गाईडची सुविधा मिळते. याशिवाय, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही मोफत असते. IRCTC च्या या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत 18935 रुपये आहे.

IRCTC Goa Tour Package
IRCTC Goa Tour Package: डिसेंबरमध्ये गोव्यात यायचंय? IRCTC घेऊन आलीय परवडेबल टूर पॅकेज, पाहा डिटेल्स

IRCTC चे हे टूर पॅकेज 23 ऑगस्टपासून सुरु होणार

दरम्यान, IRCTC चे हे टूर पॅकेज 23 ऑगस्टपासून सुरु होईल आणि 13 सप्टेंबरला संपेल. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक विमानाने प्रवास करतील. टूर पॅकेजमध्ये पर्यटक कम्पर्ट क्लासमध्ये प्रवास करतील. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरुन तुम्ही आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज बुक करु शकतात. गोवा टूर पॅकेजमध्ये रेल्वे पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करेल.

IRCTC Goa Tour Package
IRCTC Goa Tour Packages: गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेट करणार असाल तर 'या' खास टुर पॅकेजविषयी घ्या जाणून...

IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे

IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे वेगवेगळे आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर 24620 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. त्याचवेळी, दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी, टूर पॅकेजमध्ये भाडे 19245 रुपये असेल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 18935 रुपये भाडे द्यावे लागेल. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी या टूर पॅकेजचे भाडे 16090 रुपये असेल. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना बेडशिवाय 15720 रुपये द्यावे लागतील. 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांचे भाडे 8615 रुपये असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com