Kadamba bus conductor returns wallet Dainik Gomantak
गोवा

Goa Transport: कंडक्टर धावला देवदूतासारखा! 'कदंब'मध्ये हरवले पाकीट, बस वाहकामुळे सापडले परत; प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक

Kadamba Bus Conductor: केरकर यांनी हे पाकीट आगाराचे नियंत्रक सुयश सावंत यांच्याकडे सुपूर्त केले. यानंतर, पाकीट हरवलेल्या प्रवाशाने आगारामध्ये येऊन ओळख पटवली.

Sameer Panditrao

पेडणे: पणजी – प्रवाशांच्या मालमत्तेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा एक घटना नुकतीच समोर आली आहे. पणजी-दोडामार्ग-मोले या मार्गावर धावणाऱ्या कदंब महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशाचे रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट सापडले.

या बसचे वाहक बाळा अनंत केरकर यांनी हे पाकीट प्रामाणिकपणे पणजी कदंब आगारामध्ये आणून दिले.पाकिटामध्ये रोख ३०५० रुपये, आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि १००० किमतीचे एडसिव्ह स्टॅम्प होते.

केरकर यांनी हे पाकीट आगाराचे नियंत्रक सुयश सावंत यांच्याकडे सुपूर्त केले. यानंतर, पाकीट हरवलेल्या प्रवाशाने आगारामध्ये येऊन ओळख पटवली. पणजी आगाराचे एटीआय देवीप्रसाद भट, गजानन गावकर आणि एटीएस सुयश सावंत यांच्या उपस्थितीत हे पाकीट त्या प्रवाशाला परत देण्यात आले.

केरकर यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या घटनेतून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमधील विश्वास वाढवण्यास हातभार लागला असून, बाळा केरकर यांचे प्रामाणिक कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohini Kalam: क्रीडा विश्वात खळबळ! आंतरराष्ट्रीय खेळाडूनं संपवलं जीवन, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

SCROLL FOR NEXT