Panaji District Sessions Court Dainik Gomantak
गोवा

दिव्यांग मुलीच्या मृत्यूप्रकरणी धर्मगुरु-नन यांची पणजी जिल्हा सत्र न्यायालयातर्फे दोषमुक्तता

जुने गोवा येथील सेंट झेविअर अकादमी प्रशिक्षण केंद्रातील घटना

Kavya Powar

Disabled Girl Death: जुने गोवा येथील सेंट झेविअर अकादमी प्रशिक्षण केंद्रात 7 वर्षीय दिव्यांग मुलीच्या मृत्यूप्रकरणात संशयित असलेल्या धर्मगुरु आणि नन यांना पणजी जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष जाहीर केले आहे.

या फेब्रुवारीमध्ये प्रशिक्षण केंद्रात 7 वर्षीय मुलीचा गरम पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झाला होता. धर्मगुरु आणि नन यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप करण्यात आला होता.

याप्रकरणी दोघांवरही भादंसं कलम 304 ए, दिव्यांग कायदा 2016, बाल न्याय कायदा 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्रशिक्षण केंद्रातील इतर लोकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या होत्या.

माहितीनुसार, ननने केंद्रातील 11 जणांना अंघोळीसाठी रांगेत उभे केले होते. त्यानंतर नन पाणी आणण्यासाठी गेली असता रांगेत उभ्या असलेल्या एकाने मुलीला पाण्यात ढककले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान धर्मगुरु आणि नन यांच्याविरोधात ठोस पुरावा नसल्याने दोघांनाही पणजी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषमुक्त जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT