Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांना मोठा दिलासा; बेकायदेशीर लीज विलंब प्रकरणातून सुटका

Goa Mining Scam: कामत यांच्याच आशीर्वादाने खनिज उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली, असा आरोप कामत यांच्यावर करण्यात आला होता.

Pramod Yadav

पणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना खाण घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पणजी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बेकायदेशीर खाण प्रकरणात माजी मुख्यमंत्री कामत आणि खाण व्यवसायिक रवींद्र प्रकाश यांच्यासह इतर 16 जणांची आरोपातून मुक्तता केली आहे.

2018 मध्ये या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) आरोपपत्रात कामत यांचे नाव होते.

दिगंबर कामत मुख्यमंत्री पदावर असताना (2007-2012) एका खाण लीजच्या नूतनीकरणात अवैध कारभार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

लीजधारकांनी 'मॅग्नम'सोबत करार केला आणि त्याद्वारे राज्य आणि केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय लीजचे अधिकार हस्तांतरित केले. कामत यांच्याच आशीर्वादाने खनिज उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली, असा आरोप कामत यांच्यावर करण्यात आला होता.

नियमानुसार राज्य सरकारकडे असा कोणताही अधिकार नसतो. तत्कालिन मुख्यमंत्री कामत यांनी दोन प्रशासकीय अधिकारी (IAS) यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे माहिती समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT