Bridge Falls In Karwar: काळी नदीवरील तुटलेल्या पुलाचा भाग कोसळला; नव्या पुलाला धोका? Watch Video

Kali River Bridge Collapsed: ऑगस्ट २०२४ मध्ये कोसळलेल्या पुलाचे अवशेष हटवण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
Kali River Bridge Collapsed
Kali River Bridge CollapsedDainik Gomantak
Published on
Updated on

कारवार: मडगाव -मंगळूरला जोडणाऱ्या हमरस्ता क्रमांक ४ काळी नदीवरील ४१ वर्षीय जुना पूल गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कोसळला. कोसळलेल्या पुलाचा भाग पुन्हा एकदा कोसळला असून, नव्या पुलावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका पिलरचा पाया खचल्याने ४० मीटर लांब सेक्शन नदीत उलटला आहे. शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे ही घटना घडली.

ऑगस्ट २०२४ मध्ये कोसळलेल्या पुलाचे अवशेष हटवण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, ४० मीटर लांब पुलाच्या सेक्शनचा पाया अचानक खचल्याने हा भाग नदीत कलंडला आहे. यामुळे शेजारच्या पुलाला काही धोका निर्माण झाला नसला तरी यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Kali River Bridge Collapsed
Bridge Collapses Near Karwar: मडगाव-मंगळूरला जोडणारा ४१ वर्षीय जुना पूल कोसळला

पुलाचे अवशेष हटवण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, उरलेला भाग हटवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. १९८३ मध्ये काळी नदीवर हा पूल उभारण्यात आला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये ४१ वर्षानंतर हा पूल कोसळला.

पुलाच्या शेजारीच नव्याने पूल उभारण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नव्या पुलाला कोणताही धोका निर्माण झाला नसल्याची माहिती याचे काम पाहणाऱ्या अभियंत्याने स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

काळी नदीवर हा पूल कमकुवत झाल्याने पाच वर्षांपूर्वी या पूलाला समांतर पूल उभारण्यात आला होता. दोन पुलांमुळे दुहेरी वाहतूक सोयीची झाली खरी पण, जुना पूल कोसळल्याने नव्या पूलावरून एकेरी वाहतूक सुरु आहे.

Kali River Bridge Collapsed
तेरा वर्षापूर्वी धोकादायक म्हणून केला होता बंद, कारवार-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पूल अखेर कोसळला

जिल्हा प्रशासनाने जुना पूल धोकादायक ठरवून २०११ मध्येच वाहतुकीसाठी बंद केला होता. कोणत्याही क्षणी कोसळू शकतो या भीतीने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पण, स्थानिकांनी पूल बंद करण्यास विरोध केल्याने किरकोळ दुरुस्ती करुन पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. अखेर, ऑगस्ट २०२४ मध्ये तो पूल कोसळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com