Mala Lake Fish Mortality Case Dainik Gomantak
गोवा

Mala Lake: मळा तलावात ७ घरांचे सांडपाणी; जोडणी सील, महापालिकेची न्यायालयात माहिती

Mala Lake Fish Mortality Case: सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष पाहणीत एक सांडपाणी वाहिनी खराब झाल्याचेही निदर्शनास आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: येथील मळा तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या सुनावणीत पणजी महानगरपालिकेने त्‍या परिसरात उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या सात घरांची ओळख पटवून त्यांची जोडणी (आउटलेट्स) सील केल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने संबंधित घरमालकांना अधिकृत सांडपाणी जोडणीसाठी तातडीने अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत पर्यावरण संरक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. ज्या घरांचे आउटलेट्स सील करण्यात आले आहेत, त्यांनी सांडपाणी आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे रीतसर अर्ज सादर करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, महामंडळाने या सात अर्जांवर प्राधान्याने आणि तातडीने कार्यवाही करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले.

सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष पाहणीत एक सांडपाणी वाहिनी खराब झाल्याचेही निदर्शनास आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली. ही वाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. संबंधित न्यायालयीन आदेश घरमालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून २०२६ रोजी होणार आहे.

न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

  • उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या सात घरांची जोडणी सील.

  • संबंधित घरमालकांना अधिकृत सांडपाणी जोडणीसाठी अर्ज करण्याचे आदेश.

  • हे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे सांडपाणी महामंडळाला निर्देश.

  • खराब सांडपाणी वाहिनीची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू.

  • प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT