Illegal Sand Mining Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: पणजी किनारपट्टी पोलिसांची बेकायदा रेती उपसाप्रकरणी कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

Illegal Sand Mining At Panaji: पणजी किनारपट्टी पोलिसांनी काल रात्री वळवई-मायणा येथे धडक मोहीम राबवत मांडवी नदीपात्रात बेकायदा सुरू असलेल्या रेती उपसावर कारवाई केली.

Sameer Panditrao

Illegal Sand Mining One Arrested Panaji

पणजी: पणजी किनारपट्टी पोलिसांनी काल रात्री वळवई-मायणा येथे धडक मोहीम राबवत मांडवी नदीपात्रात बेकायदा सुरू असलेल्या रेती उपसावर कारवाई केली. या कारवाईत एक होडीसह पाच क्युबिक मीटर रेती मिळून सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी संशयित समीर मोंडल (३०, पश्‍चिम बंगाल) याला अटक करण्यात आली. पोलिसांना पाहताच या बोटीवर असलेले सुमारे १२ मजूर पसार झाले. यासंदर्भात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पणजी किनारपट्टी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अजित उमर्ये यांनी दिली.

राज्यात रेती उपशास बंदी आहे. बेकायदा रेती उपसासंदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश यापूर्वीच उच्च न्यायालयाने संबंधित सरकारी यंत्रणांना दिले आहेत.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या ३०३ (२),३(५) तसेच खाण आणि खनिज (विकास नियमन) कायदा आणि गोवा दमण आणि दीव गौण खनिज सवलत नियम १९८५ चा ६२ (२) अन्वये पणजी किनारी पोलिसांनी १२ संशयितांसह समीर मोंडल (३०, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या मजुरांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी पणजी किनारी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अजित उमर्ये यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT