Shivjayanti 2024 Goa Dainik Gomantak
गोवा

Shivjayanti 2024 Goa: शिवजयंतीनिमित्त पणजीत भव्य मिरवणूक: उत्सव समिती स्थापन

Shivjayanti 2024 Goa: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंयतीचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Shivjayanti 2024 Goa

पणजी महानगरपालिकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंयतीचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर ते आझाद मैदान भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याचे विलास सतरकर यांनी सांगितले. पणजी महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, संतोष सुर्लीकर, विवेक पार्सेकर, सिद्धेश नाईक उपस्थित होते.

दरम्यान सतरकर म्हणाले, या कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी रोहित मोन्सेरात, उपाध्यक्ष संतोष सुर्लीकर, खजिनदार संजीव नाईक, सचिव विवेक पार्सेकर, तर उपखजिनदारपदी सिद्धेश नाईक यांची नेमणूक करण्यात आली.

लेझिम,महिलांचे ढोल पथक आकर्षण

या मिरवणुकीत चित्ररथ, पणजीतील स्थानिक महिलांचे ढोल पथक, लेझिम पथक, शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिका मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून या मिरवणुकीत विद्यार्थी तसेच नागरिकांनी छ.शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंच्या वेशाष सहभागी व्हावे, असे आवाहन सतरकर यांनी केले.

स्पर्धांचे आयोजन

आझाद मैदान येथे शालेय विद्यार्थी तसेच खुल्या गटात अखिल गोवा पातळीवर वेशभूषा स्पर्धा, पोवाडा स्पर्धा तसेच किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन विलास सतरकर यांनी केले.

तसेच मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, याची काळजी देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Accident: इलेक्ट्रिक कदंब झाली ब्रेकडाऊन, पार्क केलेल्या गाड्यांना दिली धडक; ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा

Mansion House Cup: चुरशीच्या लढतीत FC शिवोली जिंकली! पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवले कुडतरी जिमखान्यास

International Literacy Day: 1950मध्ये टुरिंग टेस्ट सुचवली, यंत्राची बुद्धिमत्ता तपासली गेली; AI साक्षर होणं काळाची गरज

Stone Exhibition: दगडात शोधला 'देव'! पर्येच्या परेशने भरवले अनोखे प्रदर्शन

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट खून प्रकरणातील आरोपीला विदेशात जाण्याची परवानगी; बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाणार

SCROLL FOR NEXT