Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : काकुलो जंक्शन वाहतुकीला खुले; आयपीएससीडीएलची माहिती

Panaji News : नव्याने तयार झालेला ३५० मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, सांतिनेजमधील काँक्रिटिकरणासाठी बंद ठेवण्यात आलेले काकुलो जंक्शन अखेर वाहतुकीसाठी खुले केले आहे.

त्याशिवाय काकुलो जंक्शन ते टोंक येथील मलनिस्सारण प्रकल्पासमोरील (एसटीपी) पुलापर्यंतचा मार्गही खुलाही केल्याचे इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) जाहीर केले आहे.

नव्याने तयार झालेला ३५० मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. ताड-माड ते एसटीपी पर्यंतचा उर्वरित दीडशे मीटरचे खोलवरून मल्लनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम योग्यवेळी सुरू केले जाईल. ताड-माड येथे काही दिवसांपूर्वी खचलेला भाग आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने खुला होणार आहे.

नागरी सुविधा आणि चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीकरांसाठी तयार केल्या जात आहेत.

नव्याने झालेल्या रस्त्यामुळे वाहतूक सुरळी होणार आहे. त्याशिवाय पूर्वीपेक्षा रुंद रस्ते झालेले आहेत.

काकुलो मॉल ते एसटीपीसमोरील पुलापर्यंतचे नव्या रस्त्याचे काम हे स्मार्ट सिटीच्या कामामधील खरोखर माईलस्टोन ठरले आहे. हा रस्ता वाहतूकदारांना फायदेशीर ठरणार आहे, असे आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांवेळी सांतिनेज परिसरासर इतर ठिकाणच्या नागरिकांनी केलेल्या सहकार्य महत्त्वाचे ठरले.

कामावेळी त्यांनी दाखविलेल्या संयमाचीही आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. मागील सहा ते आठ महिन्यांत मलनिस्सारण वाहिनी टाकताना अनेक अडचणींचा सामना कंत्राटदारांना करावा लागला आहे, जमिनीखाली कमी अंतरावर लागणाऱ्या पाण्यामुळेही कामास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT