Aqua Mega Fish Festival Panaji Dainik Gomantak
गोवा

Aqua Mega Fish Festival: पणजीत रंगणार ‘ॲक्वा मेगा फिश फेस्टिव्हल’! देशभरातील विद्यार्थी, तज्ज्ञ येणार; ब्ल्यू इकॉनॉमीला चालना

Aqua Mega Fish Festival Panaji: हा महोत्सव ‘कंट्री-फर्स्ट’ संकल्पनेवर आधारित असून देशभरातील तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शाश्वत मत्स्यव्यवसाय, नवोपक्रम आणि निळ्या अर्थव्यवस्थेला (ब्ल्यू इकॉनॉमी) चालना देण्याच्या उद्देशाने ‘ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२६’च्या नवव्या आवृत्तीचे आयोजन ९ ते ११ जानेवारीदरम्यान पणजीत करण्यात आले आहे.

हा महोत्सव सकाळी १० ते रात्री १० वा. या वेळेत बांदोडकर मैदानावर होणार असून, देशात प्रथमच राज्य पातळीवर असा सर्वसमावेशक मत्स्य महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याचे मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हा महोत्सव ‘कंट्री-फर्स्ट’ संकल्पनेवर आधारित असून देशभरातील तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. महोत्सवात शाश्वत मासेमारी पद्धती, हवामान बदलाला तोंड देणाऱ्या तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि मत्स्य व्यवसायातील नवकल्पनांवर विशेष भर दिला जाईल.

दरम्यान, महोत्सवात गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकनृत्य, स्थानिक बँड्सचे सादरीकरण तसेच मच्छीमारांच्या सन्मानार्थ संगीतकार मुकेश घाटवाल यांनी रचलेले विशेष गीत सादर करण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स स्थानिक गोमंतकीयांनाच देण्यात येणार आहेत. त्यातून स्थानिक सहभाग आणि लाभ सुनिश्चित केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

SCROLL FOR NEXT