Goa Police Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘एसआयटी’ यंत्रणेचा पोलिसांकडून गैरवापर; साईश म्हांबरे यांचा दावा

कायदा हातात घेऊन फ्लॅटमध्ये प्रवेश करून दस्तावेज गायब करण्याचे प्रकार एसआयटीमधील पोलिस निरीक्षक सूरज सामंत याने केले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : खोट्या तक्रारी दाखल करून लोकांना सतावणूक करण्याचे सत्र पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून केला जात आहे. पोलिसांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी तक्रारदारांवर दबाव आणला जात आहे. कायदा हातात घेऊन फ्लॅटमध्ये प्रवेश करून दस्तावेज गायब करण्याचे प्रकार एसआयटीमधील पोलिस निरीक्षक सूरज सामंत याने केले आहेत.

पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी सामंत हे दडपण आणत आहेत. त्यांनी फ्लॉईड कुतिन्हो यांना गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकारने अशा या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य कारवाई करण्याची मागणी कुतिन्हो यांचे वकील साईश म्हांबरे यांनी केली आहे.

सालसेत मामलेदारांनी फातोर्डा पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत सुमारे 17 म्युटेशन्स फाईल्स तसेच दस्तावेज गायब असल्याचे नमूद केले होते. निरीक्षक सूरज सामंत यांनी दोघांना अटक करून कुतिन्होविरुद्ध जबानी देण्यास दबाव आणला होता.

सरकारचे अभय

समाजसेवक हनुमंत परब यांनीही पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर हे लोकांची सतावणूक करत असल्याचा दावा करून वादग्रस्त अधिकाऱ्याला सरकारचे अभय असल्याने त्याने आतापर्यंत केलेले गुन्हे पचवले आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार निवारणकडे 8 ते 10 तक्रारी आहेत. त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी परब यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT