Palolem beach dispute Dainik Gomantak
गोवा

Palolem Beach: पाळोळे किनाऱ्यावर वाद पेटला! पर्यटक बोटमालकांच्या 2 गटांत वितुष्ट; समझोत्यानंतरही धुसफूस सुरुच

Palolem Beach Boat Dispute: मात्र, हे अधिकारी गेल्यानंतर दोन्ही गटांत धुसफूस चालू झाली आहे. येथील काही बोट मालकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: पाळोळे किनाऱ्यावर स्थानिक डॉल्फिन ट्रिप मालकांमध्ये दोन गटांत वितुष्ट निर्माण झाले आहे. याचे पर्यावसान म्हणून पाटोळे येथील बोट मालकांनी बोटीचे दोन काउंटर निर्माण झाले आहेत.

एका गटांत बारा बोटी असून दुसऱ्या काउंटर मध्ये ८२ बोटींचा समावेश आहे. हे वितुष्ट मिटविण्यासाठी पर्यटन खात्याचे संचालक, पर्यटन पोलिस,उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर व मामलेदार गजेश शिरोडकर, स्थानिक नगरसेवक सायमन रिबेलो यांनी गुरुवारी पाळोळे किनाऱ्याला भेट देऊन दोन्ही गटांत समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हे अधिकारी गेल्यानंतर दोन्ही गटांत धुसफूस चालू झाली आहे. येथील काही बोट मालकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे, त्यासाठी दोन काउंटर झाल्यास या व्यवसायावर संपूर्णपणे अवलंबून असलेल्या बोट मालकांवर उपासमारीची पाळी येणार आहे. मात्र, दोन्ही गटांत सोमवारपर्यंत समझोता होणार असल्याची आशा स्थानिक नगरसेवक सायमन रिबेलो यांनी व्यक्त केली.

बेकायदा रेती वाहतूक; संशयित निर्दोष मुक्त

बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला हुसेन सय्यद (४५, दोडामार्ग) याची येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी त्‍याला अटक करण्‍यात आली होती. तसेच ट्रकमधील ३० हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली होती. त्याच्याविरोधात भारतीय न्‍यायदंड संहितेच्या ३७८, गोवा दमण आणि दीव खनिज सवलत नियम, १९८५च्या कलम ६२ (२), खाण आणि खनिज विकास नियमन कायदा, १९५७च्या कलम २१ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. दोन्ही बाजू ऐकून घेऊन न्यायालयाने आपला निवाडा देताना, संशयिताला निर्दोष ठरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

Crime News: क्रूर पती! 'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि रचला पत्नीच्या खुनाचा कट; गळा दाबून हत्या, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य

Terrorist Attack: दहशतवादी कटाचा पर्दाफाश! डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 जप्त; तपास यंत्रणांची धावपळ

Wasim Akram: "उनको गेंदबाजी करना मतलब एक परीक्षा..." वसीम अक्रमने भारतीय क्रिकेटपटूबाबत केलेलं विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT