Palolem Beach : पाळोळे किनाऱ्यावर भल्या मोठ्या चेंडूचे गूढ! नागरिकांत घबराट

Palolem Beach Ball Mystery : वजनाने जड बॉल स्थानिकांनी ठेवला बांधून
Palolem Beach  Ball Mystery
Palolem Beach Ball MysteryDainik Gomantak

काणकोण, पाळोळे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी रात्री एक भला मोठा चेंडू येऊन थडकल्याने नागरिकांमध्ये आश्चर्ययुक्त घबराट निर्माण झाली आहे. हा बॉल आकाराने मोठा तसेच वजनानेही खूप जड आहे.

स्थानिक रहिवाशांना हा बॉल दिसल्यानंतर तो दोरीच्या साह्याने किनाऱ्यावर बांधून ठेवला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा बॉल एक तर नौदलाचा असू शकतो. मात्र, ज्यांच्या मालकीचा हा चेंडू आहे, त्यांनी तो किनाऱ्यावरून हटवावा व येथील रहिवाशांना भयमुक्त करावे, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

पाळोळे समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या या बॉल सदृश्य वस्तूवर ‘बोयो’ हे स्टिकर असून नंबरही आहे, असे तळपण येथील तटरक्षक दलाचे पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी सांगितले. यापूर्वीही जून - जुलै महिन्यात बेतुल व अन्य किनाऱ्यांवर अशी वस्तू येऊन पडल्यानंतर संबंधित संस्थांनी त्यावर आपला दावा सांगून ती ताब्यात घेण्याच्या घटना घडल्या असल्याचे नवलेश देसाई यांनी सांगितले.

Palolem Beach  Ball Mystery
Unique Goa : गोव्यातील निसर्ग पर्यटनासोबत घ्या 'या' युनिक गोष्टींचा आनंद

नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी

पाण्यात तरंगणारी ही बॉल सदृश्य वस्तू नौदल, सी बर्ड, कॅप्टन ऑफ पोर्टस, समुद्र विज्ञान संस्था आपल्या बोटींना वापरतात. हा बॉल पाळोळे किनाऱ्यावर सापडल्यानंतर त्याची माहिती संबंधित सर्व संस्थांना देण्यात आली.

त्याप्रमाणे नौदल, सी बर्ड व कॅप्टन ऑफ पोर्टच्या अधिकऱ्यांनी येऊन पाहणी केली. मात्र, त्यांनी ती वस्तू आपल्या मालकीची नसल्याचे सांगितले. कोणीही त्या बॉल सदृश्य वस्तूवर दावा न सांगितल्यास कॅप्टन ऑफ पोर्टस ती आपल्या ताब्यात घेणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com