palliative care service File Photo
गोवा

South Goa: सुखद बातमी! दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांसाठी दक्षिण गोवा रूग्णालयात खास सेवा

विशेष बाब म्हणजे रूग्णालयात यायला सक्षम नसलेल्या रूग्णांना घरी देखील ही सेवा पुरवली जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांसाठी दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात खास सेवा सुरू करण्यात आली आहे. दिर्घ काळापासून विविध आजारातून जात असलेल्या रूग्णांना आता या जिल्हा रूग्णालयात सेवा आणि सुश्रुषा पुरविली जाणार आहे. यासाठी सिप्ला फाऊंडेशनसोबत दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात (South Goa District Hospital) समर्पित 'पॅलिएटिव्ह केअर सर्व्हिस' सुरू करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

(palliative care service at South Goa District Hospital)

'पॅलिएटिव्ह केअर सर्व्हिस'चा उद्देश

रूग्णांना होणारा त्रास आणि आजारांच्या लक्षणांपासून आराम देणे

वैद्यकिय तज्ञांच्या मदतीने रूग्णांच्या उपचारात सातत्य ठेवणे

रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना आजार आणि त्यासंबधी रूग्णाची काळजी कशी घ्यावी याची माहिती देणे

रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यांना आधार देणे

आजारासंबधित इतर सहाय्यता पुरवणे

'पॅलिएटिव्ह केअर सर्व्हिस' (palliative care service) सोमवार ते शनिवारी सकाळी 10 to रात्री 12 या वेळेत सुरू राहणार आहे. विशेष बाब म्हणजे रूग्णालयात यायला सक्षम नसलेल्या रूग्णांना घरी देखील ही सेवा पुरवली जाणार आहे. यासाठी हा रूग्ण रूग्णालयासोबत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 'पॅलिएटिव्ह केअर सर्व्हिस'बाबत अधिक माहितीसाठी 9518735280 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT