Pilerne Fire
Pilerne Fire  Dainik Gomantak
गोवा

Pilerne Fire: बर्जर पेंट कंपनीचे गोदाम खाक; गोव्याच्या इतिहासातील भीषण आग

दैनिक गोमन्तक

Pilerne Fire: पिळर्ण येथील गोवा औद्योगिक वसाहतीमधील ‘बर्जर बेकर कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या कंपनीचे गोदाम या दुर्घटनेत पूर्णतः जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. राज्यभरातून मागवलेले 40 बंब ही आग विझवण्यासाठी कार्यरत होते. शिवाय लष्करासह नौदलाचीही याकामी मदत घेण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

प्राप्त माहितीनुसार, ही आग मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास लागली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात काळ्या धुरांचे लोट आकाशात सातत्याने जात होते. हे धुराचे लोट घटनास्थळापासून दहा ते बारा किलोमीटरपर्यंत पसरले होते. या धुराचे लोट लगतच्या साळगाव, पर्वरी, कांदोळी तसेच पणजी, ताळगाव परिसरातूनही दिसत होते.

आग लागल्याचे लक्षात आले, तेव्हा कंपनीच्या गोदामामध्ये काम सुरू होते. एकूण 94 कामगार यावेळी कामावर होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने ती विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग आटोक्याबाहेर गेल्यानंतर कंपनीमधील फायर अलार्म वाजवून सर्वांना सतर्क केले.

त्यानंतर प्रत्येकाला गोदामामधून बाहेर काढले. सुदैवाने कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाचे सुमारे 15 बंब घटनास्थळी होते. यावेळी औद्योगिक वसाहतीमधील पाण्याचा देखील वापर केला जात होता.

त्याचप्रमाणे 25 खासगी पाण्याचे टँकरही मागविले होते. अग्निशमन दलाची वाहने तसेच या टँकरमधील पाणी वारंवार वापरले जात होते.

बॅरेल, डब्यांच्या स्फोटांमुळे सतत भडकत होती आग

आग लागलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात फिनिशिंग केलेले साहित्य (पेंटचे डबे) तसेच इतर साहित्य होते. आग लागल्याने यातील काही डबे तसेच बॅरेलचे मध्येच स्फोट व्हायचे. त्यामुळे आग आणखी भडकत राहिली. या कंपनीत विविध रंगांची निर्मिती केली जाते. या रंगांमध्ये विविध केमिकल्सचा वापर होतो. त्यामुळेच आग रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात भडकत राहिली.

परिसरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले

कंपनीत काही ठिकाणी दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, इतर ठिकाणी आग भडकतच राहिली. या दुर्घटनेनंतर कंपनीच्या दोनशे मीटर क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. त्याचप्रमाणे जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा इस्पितळात ऑक्सिजनसह सर्व तयारी करण्यास सांगितले. शिवाय स्थानिक लोकांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT