Goan tourists Pahalgam attack video Dainik Gomantak
गोवा

Pahalgam Terrorist Attack: 'जेवण करायला थांबलो म्हणून बचावलो'; पहलगाम हल्ल्यापूर्वीचा गोमंतकीय पर्यटकाने सांगितला थरारक अनुभव Watch Video

Goan tourists in Pahalgam: पहलगाममधल्या दहशतवादी हाल्याच्यावेळी तिथे गोव्यातील पर्यटक देखील श्रीनगरमध्ये उपस्थित होते, दैव बलवत्तर म्हणून कोणालाही जीवितहानी झाली नाही

Akshata Chhatre

श्रीनगर: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्यात २६ जणांनी जीव गमावला असून अनेकजणं जखमी झालेत. पहलगाममधल्या दहशतवादी हाल्याच्यावेळी तिथे गोव्यातील पर्यटक देखील श्रीनगरमध्ये उपस्थित होते, दैव बलवत्तर म्हणून कोणालाही जीवितहानी झाली नाही.

श्रीनगरमध्ये गोव्यातील दोन पर्यटकांचे गट गेले असताच दहशतवादी गटाने हल्ला केला. गोव्यातील याच पर्यटकांचा व्हिडिओ समोर आलाय, ही लोकं त्यांचा भयाण अनुभव मांडतायत आणि आखों देखी घटना सांगतायत. 

पर्यटक म्हणतायत की हल्ला झाला त्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. २२) ते पहलगाम येथील  बैसरन पॉईंटला फिरायला जाणार होते, मात्र जेवण करत असताना अचानक गोळ्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. जखमी लोकं दुर्दैवी अवस्थेत पाळताना बघितल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र ट्रॅव्हल बग या त्यांच्या ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाने सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं आणि श्रीनगरला आणून सोडलं.

दुसऱ्या दिवशी याच लोकांनी श्रीनगरमधून व्हिडिओद्वारे गोव्यातील लोकांना ते सुरक्षित असल्याची माहिती दिलीये, "व्ही आर सेफ" असं म्हणत त्यांनी आणि गोव्यातील त्यांच्या परिवाराने सुटकेचा निश्वास सोडलाय. 

जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले गोव्याचे ५० हून अधिक नागरिक सध्या श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये सुरक्षित आहेत आणि सध्या तातडीने त्यांना पुन्हा गोव्यात घेऊन येण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गोव्यातील टूर ऑपरेटर्सही सर्व पर्यटकांना जम्मू आणि काश्मीरमधून परत आणण्यासाठी नियोजन करत आहेत.

शक्य तेवढ्या लवकर या पर्यटकांना सुखरूप घरी आणलं जाईल अशी खात्री टुरिंग कंपनीकडून देण्यात आलीये. जम्मू आणि काश्मीरमधून येणाऱ्या विमानांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे टूर ऑपरेटर्सना पर्यटकांना तेथील हॉटेल्समध्ये ठेवावे लागले आहे, मात्र कुठलीही कसर न सोडता त्यांना वेळेत आणि सुरक्षित घरी आणून सोडलं जाईल असं कंपनीच्या मालकांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

SCROLL FOR NEXT