Brahmeshanandacharya Swami Dainik Gomantak
गोवा

पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीं यांनी श्री महालक्ष्मी मंदिराला दिली भेट

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतरची ही पहिलीच देवस्थानांची भेट होती

दैनिक गोमन्तक

डिचोली: श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी शिरसईतील श्री महालक्ष्मी मंदिर व श्री समर्थ राष्ट्रोळी देवस्थाला भेट दिली. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतरची ही पहिलीच देवस्थानांची भेट होती. यावेळी ब्राह्मीदेवी, गजेश मांद्रेकर, रामा टेमकर, शुभक्षण नाईक व पांडुरंग उत्तुरकर व पीठाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महालक्ष्मी मंदिराच्या समितीतर्फे प्रिती नवनाथ कानोळकर या दांपत्याने आणि श्री समर्थ रास्ट्रोळी देवस्थान समितीतर्फे मिलन एकनाथ नाईक या दांपत्याने स्वामीजींची ओवाळणी करत स्वागत केले.

ऐतिहासिक भेट

स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी श्री समर्थ राष्ट्रोळी देवस्थाला दिलेली भेट ऐतिहासिक ठरली. 1981 साली राष्ट्रसंत सद्‍गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांनी व ब्रह्मेशानंदाचार्य यांची प्रथम दर्शनभेट शिरसईत श्री समर्थ राष्ट्रोळी देवस्थानी झाली होती. हा सविस्तर वृत्तांत ब्रह्मानंदाचार्य स्वामींच्या ब्रह्मसत्यम् या जीवन चरित्रात लिखित आहे. त्यामुळे पूज्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतरच्या प्रथम देवस्थान भेटीत ही भेट ऐतिहासिक ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

AI Based Exam Reforms: पेपरफुटीला कायमचा आळा बसणार? परीक्षेच्या दिवशी AI तयार करणार प्रश्नपत्रिका!

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

SCROLL FOR NEXT