छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त डॉ. अजित आपटेंचे म्हापशात व्याख्यान

मासोर्डे येथे कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: शिवजयंतीनिमित्त पुणे येथील डॉ. अजित आपटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यान परवा शनिवार दि. 19 रोजी सायंकाळी 5.30 वाजता म्हापसा येथील हनुमान नाट्यगृह सभागृहात होणार आहे. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसाचे अध्यक्ष अमेय वरेरकर व रोटरी क्लब ऑफ गोमंतकचे अध्यक्ष प्रशांत बर्वे यांची उपस्थिती असेल. रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसा आणि रोटरी क्लब ऑफ गोमंतक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजयंती उत्सव व्याख्यान’ या उपक्रमाच्या अंतर्गत होणाऱ्या या व्याख्यानासाठी म्हापसा येथील लोकमित्र मंडळाचे सहकार्य लाभले आहे. समस्‍त शिवप्रेमींनी या व्‍याख्‍यानाला उपस्‍थिती लावावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यात आले आहे.

मेणकुरे येथे दिंडी, सत्‍कार सोहळा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मेणकुरे येथेही विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे. मेणकुरे शिवजयंती उत्सव समिती आणि मेणकुरे फ्रेंड्स सर्कल कल्चरल स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिवजयंती सोहळा होणार आहे. दुपारी 3.30 वाजता मेणकुरे येथील सेंट्रल बँकेकडून दिंडी काढण्यात येणार आहे. श्री माऊली मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर श्री महादेव मंदिराजवळ दिंडीची सांगता होईल.

दरम्‍यान, शिवजयंतीनिमित्त मेणकुरेसह पंचायत क्षेत्रातील आमठाणे आणि धुमासे भागातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. विनय मडगावकर तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास संशोधक सचिन मदगे उपस्थित राहणार आहेत. अन्य मान्यवरांमध्‍ये विश्व हिंदू परिषदेचे गोविंद चोडणकर, मेणकुरे सरपंच संजना नाईक, श्री माऊली देवस्थानचे अध्यक्ष देवू नाईक यांचा समावेश असेल.

Chhatrapati Shivaji Maharaj
पंतप्रधान गोव्यात येऊन गेले; हेलिपॅड मात्र तिथेच

श्री शांतादुर्गा कला मंच मासोर्डे आणि सम्राट क्लब वाळपई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कथाकथन स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तर वक्तृत्व स्पर्धा इयत्ता सहावी ते दहावीसाठी आहे.

कथाकथन स्पर्धेसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग’ हा विषय आहे. कथा कमीत कमी 3 मिनिटांची तर जास्तीत जास्त 4 मिनिटांची असावी. विषयाला अनुसरून गोष्ट नसल्यास त्या गोष्टीचे परीक्षण केले जाणार नाही. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘आजचे राज्यकर्ते आणि शिवाजी महाराज’ असा विषय असून भाषण कमीत कमी 5 मिनिटे व जास्तीत जास्त 7 मिनिटांचे असावे. भाषण विषयाला अनुसरून नसल्यास त्याचे परीक्षण केले जाणार नाही. या स्पर्धा शनिवार दि. 19 रोजी संध्‍याकाळी 4 वाजता मासोर्डे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्‍या मंडपात होतील. अधिक माहितीसाठी 18 फेब्रुवारीपूर्वी आयोजकांशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
निवडणूक अधिकाऱ्यांचे सर्व पक्षांकडून कौतुक

डोंगरीत ‘शिवस्वराज्य’तर्फे भव्‍य रॅली

डोंगरी व तारीकिट्टा डोंगरी येथील ‘शिवस्वराज्य’तर्फे शिवजयंतीनिमित्त शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी भव्‍य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता ती सुरू होईल. रॅलीला गोवा वेल्हा पेट्रोलपंपजवळून प्रारंभ होईल. तत्पूर्वी त्‍यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या डोंगरीच्या शिवप्रेमींनी दुपारी 3 पूर्वी नियोजितस्थळी एकत्र होणे आवश्यक आहे. येथूनच पुढील मार्ग निश्चित होणार आहे, असे आयोजकांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

म्हापसा हुतात्मा चौकात कार्यक्रम

बार्देश तालुका शिवछत्रपती जयंती समारोह समितीच्या वतीने 19 रोजी सकाळी 8.30 वाजता हुतात्मा चौकातील शिवरायांच्‍या पुतळ्याजवळ शिवजयंती उत्सव कार्यक्रम होणार आहे. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. गुरुदास नाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत शंभू भाऊ बांदेकर, अमर कवळेकर, संजय हरमलकर, एकनाथ नागवेकर, रत्नपाल साळकर, महादेव नाटेकर, मोहन काणेकर, हनुमंत वारंग, उल्हास कुबल, रोहन कवळेकर, प्रा. रवींद्र फोगेरी, प्रकाश धुमाळ, सदानंद शेट नागवेकर. विश्वासराव नागवेकर आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम

पर्ये-सत्तरीत शिवरायांच्‍या प्रतिमेचे पूजन, रॅली

पर्ये-सत्तरी येथील ग्रामस्थ व युवकांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पर्ये ग्रामपंचायत कार्यालयाजवळ साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व आणि जनहिताच्या विचारांची प्रेरणा ग्रामस्थांमध्ये, युवकांमध्ये रुजावी, शिवरायांचा स्वाभिमान आणि अभिमान त्यांच्यात निर्माण व्हावा या ध्यासाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, दुपारी 3 वाजता भूमिका देवीच्या प्रांगणातून भव्‍य रॅली काढण्‍यात येईल व ती बेलवाडा, तामिडगी, गोसावीवाडा, गुरववाडा, पडोसे, तुळशीमळा, मठ, माजिकवाडा, सावंतवाडा, घोलवाडा, म्हाळशेकरवाडा, आरुणेवाडा, चिंचमळा व परत ग्रामपंचायत अशी काढण्‍यात येईल. असणार आहे. संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. यावेळी शिव व्याख्याते वासुदेव गावस यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com