P.Chidambaram Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसची कमान युवा पिढीवर: पी. चिदंबरम

ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक चिदंबरम, सहभागाचे आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी: प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्षपदी तसेच विरोधी पक्षनेतेपदी युवाशक्तीची नियुक्ती करून काँग्रेसने यापुढे युवा नेत्यांना संघटित करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी 2024 च्या लोकसभा व 2027 च्या विधानसभा निवडणुकांत तेच दर्जेदार कामगिरी करतील. युवा पिढीने मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माजी केंद्रीय वित्तमंत्री तसेच गोव्याचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी केले. पणजीतील ग्रीन एकर्स येथे प्रदेश काँग्रेस समितीतर्फे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे पदाची सूत्रे सोपिवण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला काँग्रेसचे आजी - माजी पदाधिकारी, आमदार, खासदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

चिदंबरम पुढे म्हणाले, की यापुढे काँग्रेस पक्षाची धुरा युवा टीम सांभाळेल. राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी गोव्यातील युवा नेत्यांकडे पक्षाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी युवा नेत्यांनी संघटितपणे काम करावे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत तसेच माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व त्यांच्या टीमने कठीण काळात पक्षाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.67 टक्के लोकांनी भाजपविरोधात मतदान करूनही जो बदल हवा होता तो होऊ शकला नाही. पुन्हा तेच सरकार सत्तेवर आल्याने आता गेल्या दहा वर्षांप्रमाणे हे सरकार पुढे विकास करणार आहे. त्यामुळे युवा पिढीने यावर मात करण्यासाठी पुढे यायला हवे व सक्षम होण्याची गरज आहे.

युवा पिढीने बदल घडवून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे. गेले नऊ महिने निवडणुकीच्या काळात गोव्यात होतो. त्या काळात काँग्रेसच्या नेत्यांबरोबर व कार्यकर्त्यांबरोबर घालविलेले दिवस स्मरणात राहतील. माझी मदत नेहमीच राहील असे त्यांनी सर्वांचा निरोप घेताना भावूक होत सांगितले.

‘लोकांना पुन्हा भाजप सरकार नको होते’

लोकांना भाजप सरकार पुन्हा सत्तेत नको होते. मात्र, ज्यांनी भाजपला मतदान न करता बदल केला त्यांनी इतर प्रादेशिक पक्षांना मतदान केले. त्यामुळे काँग्रेसला ६ मतदारसंघात जागा गमवाव्या लागल्या. या मतदारसंघातील मतांचा फरक फक्त ३ हजार होता. या मतांनी राज्यात भाजप सरकारला पुन्हा सत्तेवर आणले, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले._

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT