Farmagudi Accident: फर्मागुडी सर्कल येथे मंगळवारी सकाळी कंटेनर ट्रकचा अपघात झाला. हा ट्रक अचानक पलटला. त्यामुळे ट्रकचालक जखमी झाला. ट्रक कलंडल्याने ट्रकचालक ट्रकमध्ये अडकून पडला होता.
यावेळी जीव्हीएम्स कॉलेजमधील युवकांनी येथे धाव घेत या ट्रकचालकाला ट्रकमधून बाहेर काढले. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या ठिकाणाजवळच जीव्हीएम्स कॉलेज आहे. अपघातापुर्वी केवळ एक मिनिट आधी जीव्हीएम्स महाविद्यालयातील 10 ते 15 युवक घटनास्थळी उभे होते. हे युवक कॉलेज गेट आणि पार्किंग एरियासमोर उभे होते. एक मिनटापुर्वी हे सर्व तिथून निघून गेल्याने मोठा अपघात टळला.
सकाळी 11 च्या सुमारास हा कंटेनर ट्रक पणजीहुन बोरीमार्गे जात होता. फर्मागुडी सर्कलवर वळण घेत असताना चालकाचा ट्रकवरील ताबा गेल्याने ट्रक भर रस्त्यात कलंडला.
केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला येथील विध्यार्थ्यानी काच फोडुन बाहेर काढले. काच फोडताना विध्यार्थ्याच्या हातालाही काही प्रमाणात जखम झाली. किरकोळ जखमी झालेल्या चालकाला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार करुन पाठविले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी अपघाताचा पंचनामा केला.
दरम्यान, अपघातस्थळी जमलेल्या लोकांनी फर्मागुडी सर्कलचा आकार कमी करण्याची मागणी केली. मोठे सर्कल होत असल्याने व सुचना फलक या ठिकाणी व्यवस्थित नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात तेव्हा सार्वजनिक वाहतूक विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही पार्किंगची मागणी केली आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे त्यांच्यापैकी बरेच जण दुचाकी घेऊन कॉलेजमध्ये येतात आणि त्यामुळे पार्किंगसाठी जागेची सोय नसल्याने रस्त्याच्या कडेला गाड्या लावाव्या लागतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.