अमली पदार्थप्रकरणी नायजेरियन ओझोव्हेराला तीन वर्षे कैद, 50 हजार दंडाची शिक्षा

2014 सालचे प्रकरण : सरकारतर्फे ॲड. सुषमा मांद्रेकर यांनी मांडली बाजू
Goa Drugs Seized
Goa Drugs SeizedDainik Gomantak

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नायजेरियन संशयित एल्विस ओझोव्हेरा (36 वर्षे) याला प्रधान सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्याला 3 वर्षाची कैद व 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. त्याच्याजवळ ड्रग्ज सापडल्याचे पुराव्याने सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने निवाड्यात निरीक्षण नोंदवले आहे.

Goa Drugs Seized
Margao Municipality : मडगाव नगरपालिकेचा जकात कर बंद झाल्यामुळे महसुलात घट

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी 28 सप्टेंबर 2014 रोजी मध्यरात्री मिरामार येथे दोघे नायजेरियन संशयास्पद फिरत असताना त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची झडती घेतली असता संशयित एल्विस ओझोव्हेराकडे 69 ग्रॅम्स ॲम्फेटमाईन तर जॉन बेनकडे 1 किलो 112 ग्रॅम गांजा सापडला होता.

या दोघांवर अंमलीपदार्थ विरोधी गुन्हा नोंदवून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने तो मंजूर केला होता.

Goa Drugs Seized
Candolim Panchayat : वारसा स्थळांच्या आवारात गैरधंद्यांना परवानगी टाळावी

संशयित एल्विस सुनावणीला उपस्थित राहत होता, तर संशयित जॉन बेन या गोव्यातून गायब झाला होता. साक्षीदारांनी न्यायालयात दिलेली जबानी तसेच केंद्रीय फोरेन्सिक लेबोरेटरी तसेच एफडीएने या ड्रग्जप्रकरणी दिलेला अहवाल सकारात्मक आला होता.

या आधारे न्यायालयाने त्याला गेल्या आठवड्यात दोषी ठरवल्यानंतर त्याची रवनागी कोलवाळ कारागृहात केली होती. सरकारतर्फे ॲड. सुषमा मांद्रेकर यांनी बाजू मांडली.

जामिनावर असतानाही ड्रग्ज विक्री `

आरोपी एल्विस ओझोव्हेरा याला या गुन्ह्यातील अटकेनंतर जामिनावर सोडण्यात आले होते. जामिनावर असताना त्याला अंमलीपदार्थविक्री पोलिसांनी अटक केली होती.

त्यामुळे आरोपी हा अट्टल ड्रग्ज विक्रेता आहे, त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा द्यावी, अशी विनंती त्याला दोषी ठरवल्यानंतर सरकारी वकिलांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com