Goa Tenant Verification Dainik Gomantak
गोवा

भाडेकरूंची माहिती न दिलेल्या 'त्या' 33 जणांविरुद्ध होणार कारवाई; गोव्यात अजून दहा दिवस पडताळणीचा धडाका

Goa Tenant Verification: पोलिसांना भाडेकरूंची पडताळणी करण्यासाठी घरोघरी जाण्याची पाळी येत होती मात्र भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या मालकांनाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर मालक अधिक सतर्क झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पुढील दहा दिवस भाडेकरू पडताळणी मोहीम सुरू राहाणार असून त्याला भाडेकरू तसेच मजूर अर्ज भरून ते सादर करू लागले आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे ६५ हजार भाडेकरू व मजुरांची पडताळणी करण्यात आली आहे.

अधीक्षक सुनिता सावंत यांनी सांगितले, दक्षिण गोव्यात या वर्षात सुमारे ३७,४०० व्यक्तींची पडताळणी करण्यात आली आहे, तर ज्या मालकांनी भाडेकरूंची माहिती सादर केलेली नाही, त्या ३३ जणांविरुद्ध कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती पाठवण्यात आली आहे.

जे कोणी कामासाठी गोव्यात आले आहेत ते स्वतःहून अर्ज भरण्यासाठी पुढे येतील व जे गोव्यात आश्रय घेण्यासाठी आले आहेत ते गोव्यात राहण्याची धाडस करणार नाहीत. कंत्राटदारांना मजुरांच्या बँक खात्याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे गोव्यातील गुन्हेगारीवर एकप्रकारे नियंत्रण येईल. ज्यांनी अर्ज भरून पडताळणी केलेली नाही, त्यांना येथील घरमालक भाडेपट्टीवर ठेवणार नाहीत.

पोलिसांना भाडेकरूंची पडताळणी करण्यासाठी घरोघरी जाण्याची पाळी येत होती मात्र भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या मालकांनाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर मालक अधिक सतर्क झाले आहेत. त्यांनी भाडेकरूंना पोलिसांत अर्ज सादर करून पडताळणी करण्याची सक्ती केली आहे. ही पडताळणी मोहीम पुढील आणखी ९ दिवस सुरूच ठेवली जाणार आहे.

दहा तारखेपर्यंत अर्ज सादर करा

ज्या ठिकाणी मोठ्या प्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणीही पोलिसांनी जाऊन मजुरांची पडताळणी सुरू केली आहे. ज्या मजुरांनी पडताळणीसाठीचा अर्ज भरलेला नसेल त्यांना गोव्यात काम करण्यास बंदी असणार आहे. कंत्राटदारांनाही त्या मजुरांना कामावर न ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. १० तारखेनंतर ज्या भाडेकरूंनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्याच्या घरमालकावर कारवाई केली जाईल असे कौशल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT