Venkatesh Dempo and Viraj Marathe  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 2 विद्यार्थ्यांची 'गुगल कोड टू लर्न कॉन्टेस्ट'मध्ये चमकदार कामगिरी

मिरामार येथील व्यंकटेश यतीश डेम्पो याने ही स्पर्धा जिंकली, तर विराज विश्वनाथ मराठे स्पर्धेच्या अंतिम फेरी पर्यंत पोहचला.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील 2 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील 'गुगल कोड टू लर्न कॉन्टेस्ट 2021' स्पर्धेत चमकदार कामगिरी करून राज्याचे नाव उंचावले आहे. मिरामार येथील व्यंकटेश यतीश डेम्पो याने ही स्पर्धा जिंकली, तर विराज विश्वनाथ मराठे स्पर्धेच्या अंतिम फेरी पर्यंत पोहचला. (Goa Students Latest News: Google Code to Learn Contest)

हे दोघेही इयत्ता 6 मध्ये शिकत आहेत. व्यंकटेश यतीश डेम्पो हा शारदा मंदिर स्कूलचा विद्यार्थी आहे, तर विराज विश्वनाथ मराठे हा डॉ. के. बी. हेडगेवार विद्यामंदिर येथे शिकत आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले मोबाईल (Mobile)अ‍ॅप्सनी 'गुगल कोड टू लर्न कॉन्टेस्ट' मधील परीक्षकांना प्रभावित केले.

व्यंकटेश यतीश डेम्पो याने स्पर्धेत ‘टुरिझम दी गोवा’ हे मोबाईल अ‍ॅप (Application) सादर केले, तर विराज विश्वनाथ मराठे याने स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून त्यांचे 'Covi companion' हे मोबाईल अ‍ॅप सादर केले.

हे दोन्ही विद्यार्थी (Students) लेगोगोवा या गटाचा भाग आहेत. यामध्ये 8 ते 12 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. “गोवा ही भारताची पर्यटन राजधानी आहे आणि अनेक पर्यटक दरवर्षी या सुंदर ठिकाणी भेट देतात. 'टूरिझम डी गोवा' या अ‍ॅपच्या मदतीने पर्यटकांना मंदिरे, संग्रहालये, समुद्रकिनारे, हॉटेल्सची माहिती मिळू शकते. 'Covi companion' हे मोबाईल अ‍ॅप कोविड रूग्णांना त्यांच्या क्वारंटाईन कालावधीत विविध प्रकारे मदत करते,” लेगोगोवा सदस्य म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

Viral Video: फोन चोरीपासून वाचवण्याचा तरुणाचा 'Z+ सिक्युरिटी' फॉर्म्युला, ट्रेनमधील अतरंगी व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावाला कशाचीच भीती नाही..."

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT