Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

मांद्रे मनोरंजन सिटीला आमचा विरोध: विजय सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी मांद्रे जुनासवाडा येथील नियोजित जागेची पाहणी केल्यावर पत्रकारांकडे बोलताना सांगितला.

दैनिक गोमन्तक

मोरजी: सरकारी जागेत एखादा प्रकल्प आणून तो खाजगीरीत्या लीजवर देणे ,या सरकारच्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करत असून मांद्रे (Mandre) येथील सरकारी जागेत होवू घातलेल्या मनोरंजन ग्रामला आमचा तीव्र विरोध हा, हा प्रकल्प जर स्थानिकाना नको असेल तर स्थानिक आमदार आणि सरकार तो लोकावर का लादतात असा प्रश्न उपस्थित करून आग्वाद किल्ला आणि मनोरंजन सिटी यालाही आमचा विरोध असल्याचे गोवा फॉरवर्ड नेते तथा आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी मांद्रे जुनासवाडा येथील नियोजित जागेची पाहणी केल्यावर पत्रकारांकडे बोलताना सांगितला.

आमदार विजय सरदेसाई यांनी पुढे बोलताना गोवा पर्यटन विकास महामंडळाची (Goa Tourism Development Corporation) सध्या लुट चालू आहे, ज्या सरकारच्या जमिनी आहे त्या जमिनी लीजवर देण्याचा सपाटा लावला आहे . करोडो रुपये खर्च करून आग्वाद किल्याचे सुशोभीकरण केले आहे आता तो किल्ला दृस्ठी या खाजगी संस्थेला लीजवर देत आहे , शिवाय मांद्रे जुनासवाडा येथील होवू घातलेला मनोरंजन ग्रामची जागा लीजवर देवून खाजगीकरण केले जाणार आहे या दोन्ही विषयांना आमचा विरोध आहे .असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान पर्यटन व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी आता निसर्गसंपन्न मांद्रे पंचायत क्षेत्रात , जुनासवाडा मांद्रे येथील सरकारी १लाख ६४ हजार चौरस मीटर जागेपैकी १लाख पन्नास हजार चौरस जमनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउदेषीय इंटरटेटमेंट व्हिलेज मनोरंजन प्रकल्प ३०० कोटी खर्च करून उभारला जाईल त्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.

तीन महिन्याच्या आत महसूल विभागाकडे असलेली जागा पर्यटन खात्यामार्फत नंतर ती गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्या ताब्यात दिली जाणार आहे .आणि त्याची पायाभरणी १९ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. जुनासवाडा वनखात्याच्या गार्डन च्या वरच्या बाजूला सरकारची एक लाख ६४ चौरस मीटर जागा आहे. एक लाख ६४ हजार जागेपैकी १४ हजार जागा सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यात एक उपविज केंद्र उभारले जाईल , व उर्वरित १ लाख ५० हजार जागेत मनोरंजनात्मक प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

एका छताखाली सर्व सोयी

या प्रकल्पात भव्य सभाग्रह , मिनी स्टुडीओ , तारांकित हॉटेल ,५०० लोकाना एकत्रित बसून बैठका , कॉन्फारंन्स सभाग्रह , निवासी व्यवस्था , पार्किंग , चेंजिंग रूम , शौचालय शिवाय पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात मनोरंजन करणारे मुव्झिक इवेंट साठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध असणार , शिवाय बाहेर देशातील उद्योगपती विविध क्षेत्रातील नागरिक व्यावसायिक यांच्यासाठी एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा युक्त जागा त्यात राहण्याची , खाण्यापिण्याची सोय व एकाच कॉन्फरन्स हॉल मध्ये एकाच वेळी 500 नागरिकाना बसण्याची सोय असणार .आहे हे यापूर्वीच स्थानिक आमदार आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी जाहीर केले होते. याच पाश्वभूमीवर 1 रोजी गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी या जागेची पाहणी केली व स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या . त्यावेळी मांद्रे गोवा फॉरवर्डचे दीपक कलंगुटकर दुर्गादास कामत, स्थानिक नागरिक व टेक्सी व्यवसाईक उपस्थित होते.

सरकारने सरकारच्या जमिनी पावणीवर काढली आहे .हि जागा अजून गोवा विकास महामंडळाच्या ताब्यात सुद्धा नसताना आखण्याचे गणित आमदार सोपटे मांडत आहे , वर्षाचा एक इवेन्ट करण्यासाठी पूर्ण जागा खाजगीरीत्या देणे योग्य नाही , गावाचा विरोध असल्याने आमचाही या प्रकल्पाला विरोध असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले . लोकाना हवा तो प्रकल्प आणा अशी त्यांनी सुचना केली.

एकाच तालुक्यात दोन इंटरटेन्मेंट झोन कसे ?

आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित करताना मोपा विमानतळ परिसरात यापूर्वीच सरकारने इंटरटेटमेंट झोन जाहीर केला आहे तर मग एकाच तालुक्यात दोन झोनची काय गरज , मांद्रे येथे मनोरंजन सिटीची गरज नसल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT