Goa Covid-19
Goa Covid-19Dainik Gomantak

Goa Covid-19: जुलै महिना दिलासा देणारा

८४ दिवसांच्‍या कालावधीमुळेच लसीकरण लक्ष्‍य अपुरे, गोव्यात कोरोनाप्रतिबंधक लसींचा मुबलक साठा
Published on

पणजी: राज्यात (Goa) कोरोना (Covid-19) नियंत्रणात येत असल्याचे संकेत मिळत आहे. कारण जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात बळींचा मृत्युदर हा २.०८ टक्क्यांवर आला. जून महिन्यात ३२७ बळी होते तर जुलै महिन्यात ही संख्या ९३ वर आली.

जुलै महिन्यात १ लाख ३३ हजार ९१८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ४,४५७ नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. ५,५८० कोरोनाबाधित बरे झाले. त्यामुळे मे महिन्यात देशासह राज्यातही थैमान घातल्यानंतर जून आणि जुलै महिन्यात तो बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. काही दिवस तर एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात आत्तापर्यंत १,७१,१४६ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या. त्यातील १,६६,९४१ व्यक्ती बऱ्या झाल्या. शनिवारी ९४ नवे बाधित, १ मृत्यू राज्यात सोमवारी ४,७७४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ९४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १२८ कोरोनाबाधित बरे झाले. एका मृत्यूची नोंद झाली. कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी ९७.५४ टक्के आहे.

Goa Covid-19
Goa: COVID-19 नंतर राज्यात डेंग्यूचे संक्रमण; फोंड्यात आठ रुग्ण

राज्यातील १८ वर्षांवरील ११ लाख ९० हजार नागरिकांना ३१ जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचे सरकारचे लक्ष्‍य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते. त्यानुसार इस्पतिळे व आरोग्य केंद्रांसोबतच पंचायती, शाळा व विविध सभागृहे आदी सुमारे ७० ते ८० ठिकाणी टिका उत्सवाअंतर्गत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झाले. त्‍यास लोकांचा प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र त्याच सुमारास केंद्रीय आरोग्य खात्याने कोरोना झालेल्या व्यक्तीला पहिला डोस घेण्याचा कालावधी २८ दिवसांवरून ८४ दिवस ते ९० दिवस केला. त्‍यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झालेल्यांना ८४ दिवस वाट पाहावी लागली. परिणामी सरकारने ठरवलेले लक्ष साध्य झालेले नाही, अशी माहिती आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी दिली. राज्यातील ज्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊन ज्या दिवशी ८४ दिवस पूर्ण होतील, त्यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल, असेही ते म्हणाले

Goa Covid-19
Goa Rape Case: पीडितेच्या पालकांना दोष नकाे

राज्यात लसीची कमतरता नाही

राज्याकडे आत्ताही ८.५० लाखांच्यावर कोरोनाप्रतिबंधक लसीचा साठा आहे. केंद्र सरकारने आत्तापर्यंत गोव्याला २० लाख ७३ हजार ३०० लसीचे डोस दिले आहेत. गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने लसीची कमतरता असताना लसीचे डोस स्वत:ही खरेदी केले. सुरुवातीला ६० वर्षांवरील व इतर आजारी नागरिकांना लसीकरण सुरु केले. त्यानंतर ४५ वर्षांवरील सरसकट सर्वांना लसीकरण सुरु झाले. तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरु करण्‍यात आले. काल ३० जुलैपर्यंत १२ लाख ९६ हजार ५७४ जणांचे लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी पूर्वी २८ दिवासांची मुदत होती, आता ती ८४ ते ९० दिवस करण्यात आली आहे. मुदत वाढवल्यामुळेच ज्यांना कोरोनाची बाधा झालेली होती, त्यांना पहिला डोस घेणे शक्य झाले नाही. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाही ८४ ते ९० दिवस थांबावे लागले आहे.

Goa Vaccination
Goa VaccinationDainik Gomantak

काही लोकांना वाटतेय भीती

कालावधी पूर्ण न झाल्याने कोरोनाप्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेतलेले सुमारे ८० ते ९० हजार लोक असतील. पण त्याचसोबत सोशल मीडियावरील अफवांवर विश्‍वास ठेवून बऱ्याच लोकांनी अद्याप लस घेतलेली नाही. या लोकांनी पुढे येऊन लस घ्यावी व सरकारच्या कोरोना नियंत्रण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com