Goa Environmental Film Festival 2023: 'गोवा एन्व्हायर्नमेंट फिल्म फेस्टिव्हल' (GEFF) च्या पहिल्या आवृत्तीची सुरुवात 3 जून रोजी ऑस्कर विजेता माहितीपट 'द एलिफंट व्हिस्परर्स'ने होणार आहे. बुधवारी राज्याचे पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पणजीतील शहरातील मॅक्क्वीन पॅलेस येथे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवात जगभरातील 50 हून अधिक पर्यावरणविषयक चित्रपट प्रदर्शित दाखवले जाणार आहेत.
काब्राल म्हणाले, गोव्यात होणाऱ्या G20 बैठकींच्या पार्श्वभुमीवर हा महोत्वस होत आहे. महोत्सवात बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, फिनलंड, आयर्लंड, ओमान, पोर्तुगाल, रशिया, स्पेन आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
चित्रपट महोत्सवाची सुरवात ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' ने होईल आणि स्पॅनिश चित्रपट 'अल्कारास' ने महोत्सवाची सांगता होईल.
हे या महोत्सवाचे पहिले वर्ष असले तरी पुढील काळात देखील हा महोत्सव कायम राहिल, असेही काब्राल यांनी म्हटले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी www.goaeff.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.