Vande Bharat Train: मुंबई - गोवा वंदे भारत ट्रेनला 'कुडाळ' येथे थांबा नाही, लोक नाराज; राणेंनी सांगितले कारण

वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनला कुडाळ स्थानकावर थांबा दिला नसल्याने काहीजण नाराज झाले असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.
Mumbai Goa Vande Bharat Train
Mumbai Goa Vande Bharat TrainDainik Gomantak

Mumbai Goa Vande Bharat Train: मुंबई - गोवा मार्गावर पहिल्यांदाच वंदे भारत हायस्पीड ट्रेन धावणार आहे. शनिवारी (दि.03) पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनचे उद्घाटन करतील.

सोमवार (दि.05 जून) पासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावला जाताना कणकवली येथे 11.20 वा ट्रेन पोहोचेल. तर, मडगाववरून मुंबइकडे जाताना 4.10 वाजता ट्रेन कणकवलीत थांबेल.

दरम्यान, वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनला कुडाळ स्थानकावर थांबा दिला नसल्याने काहीजण नाराज झाले असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. तसेच, कुडाळ स्थानकाला थांबा का दिला नाही? याचे कारण देखील राणे यांनी दिले आहे.

Mumbai Goa Vande Bharat Train
Goa Monsoon Update: पुढील चार दिवस उत्तर, दक्षिण गोव्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

"माझे काही सहकारी वंदे भारत ट्रेन जी ३ जून पासून कोकणात धावणार आहे त्या ट्रेनला कुडाळ स्टेशनसाठी थांबा मिळाला नाही याबद्दल निराश झाले पण आपल्याला मी सांगू इच्छितो मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही."

"भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते."

Mumbai Goa Vande Bharat Train
Hello Goenkar Program: हॅलो गोंयकार! CM सावंत शुक्रवारपासून दर महिन्याला जनतेशी साधणार संवाद, तुम्हीही करू शकता फोन

असा असेल मुंबई ते गोवा प्रवास

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटेल पुढे ठाणे, पनवेल, खेड असा प्रवास करत रत्नागिरीला सकाळी दहा वाजता ट्रेन येईल. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी ट्रेन गोव्यात मडगावला दाखल होईल.

गोवा ते मुंबई प्रवास

मडगाव येथून ट्रेन दुपारी 2 वा. 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. त्यानंतर रत्नागिरी, खेड इथून सहा वाजून 48 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.

तिकिटदर किती?

मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांचा आवाक्याच्या बाहेरचे आहेत. या गाडीचे चेअर कारचे तिकीट 1580 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 2870 रुपये आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार यात बदल होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com