Abasaheb More Dainik Gomantak
गोवा

World Agricultural Festival : नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन: तज्ज्ञांचे मार्गदर्शन

World Agricultural Festival : दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

World Agricultural Festival : नाशिक, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गातर्फे (दिंडोरीप्रणित) शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी २४ ते २८ जानेवारी या कालावधीत नाशिक येथील डोंगरे मैदान, गंगापूर रोड येथे जागतिक कृषी महोत्सव आयोजित केला आहे.

यानिमित्त २४ रोजी सकाळी कृषी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या महोत्सवात गोव्यातील सेवेकरी सहभाग घेतात.

२४ रोजी सकाळी ११ वा. कृषी सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी २ वाजता महोत्सवाचे उदघाटन होईल. २५ रोजी सकाळी ११ वा. ‘विषमुक्त शेती’, तर दुपारी २ वाजता ‘दुग्ध व्यवसाय’ विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.

२६ रोजी सकाळी ११ वा. ‘पर्यावरण व दुर्ग संवर्धन’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. दुपारी २ वा. स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण मेळावा होईल. २७ रोजी सकाळी ११ वा. शेतकरी वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे.

२८ रोजी सकाळी ११ वा. ‘माहिती तंत्रज्ञान जागृती - सायबर सुरक्षा’ विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या महोत्सवाचा भाग म्हणून २८ रोजी दुपारी २ नंतर नाशिक येथे सरपंच/ग्रामसेवक मांदियाळीचे आयोजन केले आहे.

यात ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, बालविकास, स्वयंरोजगार या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय महोत्सवात दररोज सायंकाळी ६ वा. सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.

हा शेतकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम असून प्रवेश विनामूल्य आहे. महोत्सवात कृषी विविधता एकाच छताखाली, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कृषी व खाद्य संस्कृती दर्शन असेल.

शेतकऱ्यांना पर्वणी : आबासाहेब मोरे

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सर्व केंद्रांमार्फत गावोगावी या महोत्सवाच्या निमित्ताने १ ते ७ जानेवारी या कालावधीत कृषी जागर सप्ताह राबवण्यात आला होता.

स्वावलंबी कृषी व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कृषिपूरक जोडव्यवसाय यामार्फत उत्पन्नात वाढ कशी करता येईल, या विषयांवर या महोत्सवात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिरत्न आबासाहेब मोरे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT