Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Cashew Festival Goa 2023: 15 पासून पणजीत काजू महोत्सवाचे आयोजन

काजूला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न - आमदार डॉ. दिव्या राणे

गोमन्तक डिजिटल टीम

Cashew Festival Goa 2023: काजू लागवड ही राज्याची वेगळी खासियत आहे. काजू हे दुहेरी फळ आहे. काजूगर आणि बोंडूचाही व्यावसायिक वापर होतो. काजू बोंडपासून फेणी व अन्य उत्पादन घेतले जाते.

फेणीमुळे गोव्याला प्रतिष्ठा लाभली आहे. फेणी हे राष्ट्रीय पेय व्हावे, हे वन विकास महामंडळाचे ध्येय आहे, असे वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी बोलताना सांगितले.

15 ते 16 दरम्यान पणजीतील कांपाल येथे काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काजू उत्पादक शेतकरी या उत्पादनाशी निगडित अन्य घटक, उद्योजक, स्वयंसाहाय्य गट यांना एकाच छताखाली आणून त्यांना चांगले व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव भरवण्यात येत आहे.

आतापर्यंत 50 हून अधिक स्टॉल्सची नोंदणी झाली आहे. अधिकाअधिक काजू उत्पादक व अन्य घटकांना यात सामावून घेण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे काजू उत्पादन वाढण्यास मदत होईल. अधिकाधिक लोकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन काजू उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राणे यांनी केले.

उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण होईल:-

महोत्सवाला सरकारचे पूर्ण पाठबळ असून काजू उत्पादन वाढावे हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे सरकारने आता काजू बियांचे दर वाढवून 150 रुपये प्रति किलो केले आहेत. सरकारचे पाठबळ आणि उत्पादनाला योग्य मोबदला मिळाला तर राज्यात काजू लागवड क्षेत्र आणखी बहरेल.

स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतून सरकार काजूला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. असेही डॉ. राणे यांनी सांगितले.

पर्यटनाला चालना:-

पर्यटकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी पर्यटन खात्याचाही हातभार लागणार आहे.

हा महोत्सव यशस्वी झाला तर दरवर्षी हा महोत्सव भरवण्यात येईल. काजू लागवड करणाऱ्या शेतकन्यांना चांगला फायदा करून देणे, हाच या मागचा मुख्य उद्देश आहे, असे डॉ. राणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्‍या उत्‍पादनांना मिळणार व्यासपीठ:-

या काजू महोत्सवात सत्तरीतील काजू उत्पादक शेतकरीही सहभागी होणार आहे. त्यामुळे सत्तरीत शेतकऱ्यांना आपले उत्पादन सादर करण्यासाठी वाव मिळणार आहे. आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नाने हा महोत्सव भरविण्यात येणार असून त्याला चांगला प्रतिसाद लाभणार असल्याचे

सत्तरीत मोठ्या प्रमाणात उत्पादन:-

यावेळी वाळपई विभागीय कृषी खात्याचे अधिकारी विश्‍वनाथ गावस यांनी ही या महोत्सवासाठी सत्तरीतील शेतकरी सहभागी होतील, असे सांगितले. सत्तरीत 80 टक्के शेतकरी काजु उत्पादन घेतात.

त्यामुळे गोव्यात पहिल्या क्रमांकावर सत्तरी आहे. त्याचबरोबर काजु गर, निरा, फेणी, हुर्राक आदीवर प्रक्रिया केली जाते. महोत्सवात सहभागी होऊन शेतकरी आपले उत्पादन सादर करू शकतात. यामुळे त्यांना नवे व्यासपीठ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

Beach Shack sealed: हणजूण किनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘कर्लिस बीच शॅक’ला टाळे! CRZ चे उल्लंघन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

SCROLL FOR NEXT