Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: महत्वाची बातमी! दूधसागर धबधब्यावरील बंदीचा आदेश मागे, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

Dudhsagar Waterfall: भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, मोले येथील दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे.

Pramod Yadav

Dudhsagar Waterfall

एक जूनपासून दूधसागर धबधबा पर्यटक वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश गोवा वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यटन विभागाचे उपवनसंरक्षकांच्या वतीने जारी करण्यात आला होता. हा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आला आहे.

दूधसागर जीप असोसिएशनच्या वतीने आदेश मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री सावंत विनंती केली होती.

भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, मोले येथील दूधसागर धबधबा देश विदेशातील पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.

पण, गेल्या काही वर्षात येथे पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या घटना समोर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एक जूनपासून, दूधसागर पर्यटन सर्किट वाहकुतकीसाठी बंद करण्याचा आदेश गोवा वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यटन विभागाच्या वतीने जारी करण्यात आला.

या संदर्भात आमदार स्थानिक आमदार डॉ.गणेश गावकर यांनी दूधसागर जीप असोसिएशन समीतीला बरोबर घेऊन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतशी चर्चा करून बंदीचा आदेश मागे घेण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करत जोपर्यंत पुन्हा बंदीचा आदेश संबंधित खात्याचा येत नाही तो पर्यंत दुधसागर धबधबा सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे जीप मालकांत उत्साह वातावरण असून, त्यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व आमदार डॉ. गणेश गावकर यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT