Goa Dainik Gomantak
गोवा

Cipla Company Accident : ‘सिप्ला’तील अपघाताच्या चौकशीचे आदेश : मुख्यमंत्री

Pramod Sawant : फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी हरकतीच्या मुद्याच्या आधारे हा विषय उपस्थित केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, वेर्णा येथील सिप्ला कंपनीत गुदमरून दोन कामगार मरण पावले. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी हरकतीच्या मुद्याच्या आधारे हा विषय उपस्थित केला होता. मरण पावलेले कुठलेही असोत; पण त्यांच्या मृत्यूची जबाबदारी कंपनीला घ्यायला लावली पाहिजे, असे ते म्हणाले.

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कारखाना व बाष्‍पक खाते, कामगार खाते, पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

मरण पावलेल्यांना नियमानुसार सारी भरपाई मिळेल याची काळजी सरकार घेईल. असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्व कारखान्यांची फेरतपासणी करण्यास कारखाना व बाष्पक निरीक्षकांना सांगितले आहे. याप्रकरणी नेमके काय झाले याची माहिती अहवाल मिळाल्यावर समजेल. कंपनी सिप्ला असो किंवा अन्य कोणी, त्यांना याप्रकरणी कोणतीही सूट दिली जाणार नाही.

वेर्णा येथील आयडीसी सिप्ला युनिट दोनमधील ब्रिकेट बॉयलर प्लांटमध्ये क्रशर (मशीन) दुरुस्त करण्यासाठी लिफ्टच्या खड्ड्यात उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT