Goa Pollution Control Board: सांडपाणी प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडले; खत कंपनीला २२ लाखांचा दंड

MLA Antonio Vaz: रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वेळसाव समुद्रात सोडल्याने खत उत्पादक कंपनीला सुमारे बावीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे असे आमदार वाझ यांनी सांगितले
MLA Antonio Vaz: रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वेळसाव समुद्रात सोडल्याने खत उत्पादक कंपनीला सुमारे बावीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे असे आमदार वाझ यांनी सांगितले
Sewage Canva, Dainik Gomantak
Published on
Updated on

रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वेळसाव समुद्रात सोडत असल्याचे उघडकीस आल्याने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने एका खत उत्पादक कंपनीला सुमारे बावीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, असे कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी सांगितले.

प्रकारामुळे समुद्रातील मासे मरत होते. तथापि, यासंबंधी कोणीच आवाज गेली काही वर्षे उठवला नव्हता. त्यामुळे, याबाबत काही अर्थकारण होते काय, असा सवाल माजी पंचायत सदस्य रोकोझिनो डिसोझा यांनी उपस्थित केला आहे. मच्छीमार बांधव एलिस्टोन पिंटो यांनी यासंदर्भात सांगितले, की काही जणांनी यामागे राजकारण खेळले असल्याचे सांगितले.

वेळसाव किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे मरून पडत असल्याप्रकरणी गोंधळ उडाला होता. खत कारखान्यातून रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने असे प्रकार घडत होते, असे सांगण्यात आले.

कंपनीने रसायनयुक्त सांडपाणी सोडण्यासाठी खास पाईपची सोय केली आहे. तथापि, त्या पाईपमधून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असल्याने मासे मरून पडत असल्याचा दावा स्थानिक मच्छीमार बांधवांनी केला होता. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी आमदार वाझ यांच्याकडे तक्रार केली होती.

आमदार वाझ यांनी या प्रकरणासंदर्भातील तक्रारीची दखल घेऊन पाहणी केली. तसेच, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला याप्रकरणी अहवाल देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तेथील पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यासंदर्भातील अहवाल मिळाला आहे. त्या सांडपाण्यामध्ये रसायन असल्याने मासे मरून पडत असल्याचे तसेच तेथील एक कंपनी ते सांडपाणी सोडत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्या कंपनीला दंड ठोठावला आहे.

या प्रकरणाची हरित लवादानेही दखल घेतली असल्याचे आमदार वाझ यांनी सांगितले. या पाण्यात आमोनिया मिसळत असल्याचे सिद्ध झाले आहे.

इतकी वर्षे तेथे मासे मरून पडत असताना त्यासंबंधी कोणीच काही बोलत नव्हते. स्थानिक नेते, मच्छीमार नेत्यांनीही हा प्रकार आपल्या कानावर कधीच घातला नाही, असेही वाझ यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्ते पिंटो यांनी वेळसाव किनाऱ्यावर मासे मरत असल्याप्रकरणी सखोल अभ्यास करून आवाज उठविल्याने सत्य बाहेर आले आहे. त्या समुद्रात आमोनिया मिश्रित पाणी सोडले जात असल्याने तेथील पाणी प्रदूषित होते. शिवाय, त्या पाण्यातील मासे लोक खातात व ते आरोग्याला घातक असल्याचे आमदार वाझ म्हणाले.

MLA Antonio Vaz: रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वेळसाव समुद्रात सोडल्याने खत उत्पादक कंपनीला सुमारे बावीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे असे आमदार वाझ यांनी सांगितले
Goa Pollution Control Board: सांकवाळ-शिंदोळी नाला प्रदूषित; आंतोन वाझ यांच्याकडून पाहणी

कोळसा प्रदूषणावर बोलणाऱ्यांचे माशांवर मौन!

माजी पंचायत सदस्य डिसोझा म्हणाले,की काहीजण रेल्वे दुपदरीकरण, कोळसा प्रदूषण यांसंबंधी आवाज उठवतात. तथापि, हा गावातील प्रश्न असूनही त्याविरोधात आवाज काहीच नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. संबंधित व्यक्तींचे त्या कंपनीकडे सोटेलोटे असल्याने ते आवाज उठवत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. पिंटो यांनी काही मच्छीमार नेत्यांना लक्ष्य केले ते म्हणाले, मी जेव्हा जेव्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आवाज दडपून टाकण्यात आला. त्यानंतर मला संघटनेतून बाहेर काढण्यात आले. तथापि, मी वेळसाव किनाऱ्यावर मरून पडणाऱ्या माशांसंबंधी सतत आवाज उठवला. त्याची दखल घेण्यात आली. त्यामुळे त्या कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com