Rain Canva
गोवा

Goa Rain Update: आज जोरदार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

Goa Weather: गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी केवळ १०.१ मिमी पावसाची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, ता. ६ (प्रतिनिधी) : राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार बरसलेल्या पावसाने दोन दिवस काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आज बुधवारी राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी केवळ १०.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एकूण ३२८९.५ मिमी म्हणजेच १२९.५० इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ५२.७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत सांगेत २२.८ मिमी, केपेत २० मिमी, काणकोणात १८.२ मिमी, साखळीत १४.८ मिमी, पेडणेत ११.४ मिमी, फोंड्यात १० मिमी, म्हापशात ८.२ मिमी, जुने गोवेत ७.४ मिमी, मडगावात ४.२ मिमी, मुरगावात १.४ मिमी, पणजीत १.१ मिमी, दाबोळीत ०.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: रासई-लोटली स्फोट! पोलिसांकडून सुरक्षा अधिकाऱ्याला अटक

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

October Heat: गोव्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! पारा 34.5 अंशांवर; पुढील 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT