Goa Rain Update: वाळवंटी नदीचे रौद्ररूप; तिळारीतून जलविसर्ग सुरु

Goa Weather: बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तर गोव्यात हाहाःकार
Goa Weather:  बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तर गोव्यात हाहाःकार
Goa Flood Valvanti RiverDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: महाराष्ट्रातील विर्डी तसेच चोर्लाघाटातील डोंगराळ भागात बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाळवंटी नदीने रौद्ररूप धारण केले. दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीच्या पुराचा तडाखा विठ्ठलापूर, काजीवाडा व बंदिरवाडा भागाला बसला.

बंदिरवाडा येथे एका घराला पाण्याने वेढा घातल्याने तीन वृध्द व्यक्ती आत अडकून पडल्या. भंडारवाडा परिसरातील घरांनाही पाण्याने वेढले. साखळी पालिका इमारतीच्या पार्किंग भागातही पाणी भरले. दरम्यान, साखळी मार्केट परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी येथील पंपिंग अविश्रांतपणे सुरू आहे.

बुधवारी सकाळपासून पावसाचा तसा मारा सुरुच होता. दुपारी नदीची पातळी वाढल्याने पंप सुरू करून साखळी बाजारातील नाल्यात साचणारे पाणी बाहेर फेकण्याचे काम हाती घेण्यात आले.

परंतु बुधवारी रात्री पावसाने जोर धरल्याने डोंगर भागात अपेक्षेपेक्षा जास्तच पाऊस पडल्याने वाळवंटी नदीला पहाटे अचानक पाणी वाढले. त्यात साखळी बाजारातील नाल्यातील पाण्याची पातळी वाढली वाढल्याने पहाटेच पंपिंग सुरू करण्यात आले.

सकाळच्या वेळी तर वाळवंटी नदीने रौद्ररूप धारण केले. नदीची पातळी ६.१ मीटर इतकी वाढल्याने साखळी बाजारात पाणी घुसू नये, यासाठी सर्व चारही पंप सुरू करण्यात आले.

रेकॉर्ड ब्रेक बरसात

यंदाचा मॉन्सून सर्वार्थाने वेगळा ठरत आहे. नवनवीन विक्रम या पावसात होत आहेत. यंदा जुलैमध्ये एकूण २१२४ मि.मी. म्हणजेच तब्बल ८३.६३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार हा गोव्यातील जुलै महिन्यात आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाऊस असल्याचे एनआयओचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.एम. आर. रमेशकुमार यांनी सांगितले.

डॉ. रमेशकुमार म्हणाले की, जुलैच्या शेवटच्या दिवशीही पावसाने जोरदार बेटिंग केली. यंदाचा मॉन्सून सर्वार्थाने नवे विक्रम करणारा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ७ जुलै रोजी एकाच दिवशी २३६ मि.मी. म्हणजेच तब्बल ९.२९ इंच पावसाची नोंद करण्यात आली, जो एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस पडण्याच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे.

राज्यात आतापर्यंत ३०९१.६ मि.मी. म्हणजेच तब्बल १२१.७१ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. जी सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ५५.१ टक्के अधिक आहे. राज्यातील पावसाचे दाबोळी केंद्र सोडल्यास सर्वच केंद्रावर १०० इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. वाळपईत पावसाने १५० इंचाचा टप्पा ओलांडून द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

Goa Weather:  बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तर गोव्यात हाहाःकार
Goa Rain Upadate: पावसाने मोडले १२४ वर्षांचे रेकॉर्ड! मोठ्या प्रमाणात नुकसान

‘तिळारी’तून जलविसर्ग सुरू

''तिळारी''तून जलविसर्ग सुरु झाल्याने शापोरा नदी तुडुंब भरली आहे. शापोरा नदीकाठी वसलेल्या साळसह अन्य गावांना ''अलर्ट'' राहण्याचा इशारा तिळारी धरण प्रकल्प अधिकारिणीने दिला आहे. दरम्यान, जलविसर्ग सुरु असला, तरी जनतेने घाबरण्याचे कारण नाही. लोकांनी पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. साळ गावावर तूर्त पुराचे संकट नाही. मी स्वतः तिळारी धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com