Opposition to three linear projects in goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात तीन रेषीय प्रकल्पांना विरोधच

निसर्गाचा ऱ्हास : कोळसा प्रदूषणामुळे लोकांचा जीव धोक्‍यात

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍यातील तीन रेषीय प्रकल्‍प रद्द करण्याची जोरदार मागणी विरोधकांनी सभागृहात केली. राज्‍य सरकारने ही मागणी फेटाळून लावत हे प्रकल्‍प देशाच्‍या आणि राज्‍याच्‍या हिताचा असल्‍याचे सांगितले. यावरून आमदार संकल्‍प आमोणकर यांना विचारले असता ते म्‍हणाले, निसर्गाचा ऱ्हास करणारे आणि लोकांचा जीव घेणारे प्रकल्‍प आम्‍ही कोणत्‍याही परिस्‍थितीत होऊ देणार नाही. वास्‍कोतील कोळसा प्रदूषणामुळे येथील लोकांचा जीव धोक्‍यात आल्‍याचे ते म्‍हणाले.

(Opposition to three linear projects in goa)

सध्या मुरगाव बंदरातून सध्या मोठ्या प्रमाणात कोळसा हाताळणी केली जाते. राज्‍यातील नियोजित तीन रेषीय प्रकल्‍प हा केवळ कोळसा वाहतुकीसाठीच सुरू आहे. हे प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यास मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी प्रचंड वाढेल. सध्याच्‍या कोळसा हाताळणीमुळे वास्‍कोवासीयांना आधीच जीव नकोसा झाला आहे. मग आणखी हाताळणी वाढल्‍यास काय होईल, हे सांगता यात नाही. कोळशाच्‍या धुळीमुळे अगदी तरुणांनाही फुफ्फुसाचे आजार होत आहेत. दम्‍याचे रोगी वाढत आहेत. ट्रकमधून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोळसा वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता ती सुरू असते. यावर येथील नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला. पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्‍यांनी केला.

गेल्‍या पंधरा-वीस वर्षात मुरगावचा कोणताही विकास झालेला नाही. येथील कचरा प्रक्रिया प्रकल्‍पावर क्षमतेपेक्षा अधिक कचरा येत असल्‍याने येथे कचऱ्याचे ढीग साठले आहेत.

मतदारसंघात अद्ययावत इस्‍पितळाची गरज आहे, असे असतानाही सरकार येथील विकास करण्याऐवजी कोळसा हाताळणी वाढवण्याकडे भर देत आहे. आणि येथील जनतेला अधिक त्रासात टाकत आहे, असे आमोणकर म्‍हणाले.

पुन्हा दक्षिण गोव्‍यात आंदोलनाची शक्यता

तीन रेषीय प्रकल्‍पाविरोधात दक्षिण गोव्‍यात मोठे आंदोलन झाले. दुहेरी रेल्‍वे मार्ग होऊ नये यासाठी लोक येथील रेल्‍वे मार्गावर रात्रंदिवस ठाण मांडून बसले होते. आंदोलनास संपूर्ण राज्‍यातून पाठिंबा मिळाला होता. राज्‍यातील 191 ग्रामपंचायतींपैकी सुमारे 120 ग्रामपंचायतींनी तीन रेषीय प्रकल्‍पांविरुद्ध ठराव समंत केले. यासाठी आणखी आंदोलन करावे लागले तरी चालेल. पण मुरगाव बंदरात कोळसा वाहतूक वाढविण्यास आम्‍ही देणार नाही, असा इशारा आमदार आमोणकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT