राज्यात धरणांची पातळी अजूनही ‘जैसे थे’

शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्‍यात पुन्‍हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
Salaulim Dam Goa
Salaulim Dam GoaDainik Gomantak

पणजी: काल शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्‍यात पुन्‍हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र राज्‍यातील धरणांची पातळी ‘जैसे थे’ राहिली आहे. गेले दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली होती.

(level of dams in the state is still the same)

Salaulim Dam Goa
गोवा-बेळगाव रस्‍त्‍याची चाळण!

राज्‍यातील प्रमुख असलेल्‍या साळावली धरणाची पाण्याची पातळी ११० टक्‍क्ंयापर्यंत वाढली आहे. पंचवाडी आणि गावणे ही धरणे १०० टक्‍के भरली आहेत. चापोली धरणाची पातळी ९५ टक्‍के झाली असून आमठाणे धरणाने ९६ टक्‍के इतकी पातळी गाठली आहे. अंजुणे धरणाची पातळी अद्याप ५८ टक्‍के इतकीच आहे. तर, पाण्याचा विसर्ग सुरू असल्‍याने तिळारी धरणाची पातळी ८५ टक्‍के इतकी झाली आहे.

तिळारी धरणात ३९ हजार १२२ हेक्‍टर मीटर पाणीसाठा आहे. साळावली धरणाचा पाणीसाठा २५ हजार ६६२ हेक्‍टर मीटरपर्यंत पोहोचला आहे. अंजुणे धरणात २ हजार ५९० हेक्‍टर मीटर इतका पाणीसाठा असून चापोली धरणातील पाणीसाठा १ हजार ६१ हेक्‍टर मीटरपर्यंत गेला आहे. पंचवाडी जलाशयात ४४८.१५ हेक्‍टर मीटर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com