Chief Minister of Goa, Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: ...म्हणून अमित शहांच्या भेटीला विरोधकांना बोलावले नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह गोव्याचे शिष्टमंडळ शहांना भेटणार

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: विरोधी पक्षाच्या आमदारांनी म्हादईवरील सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला. यावरुन म्हादईप्रश्नी विरोधकांना रस नाहीये असे त्यांनी गेल्या वेळी दाखवून दिले आहे. त्यामुळेच अमित शहांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग होण्यासाठी विरोधकांना बोलावण्यात आले नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

म्हादई वाचविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसमवेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज, बुधवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. शाह यांना जे शिष्टमंडळ भेटणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, वनमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांचा समावेश असणार आहे.

केंद्रीय जल आयोगाने म्हाईद नदीवरील प्रकल्पाबाबत कर्नाटकच्या नव्या डीपीआरला मंजुरी दिल्यापासून गोव्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध केला जात असून आता गोव्यात म्हादईसाठी जनआंदोलनही उभारले गेले आहे. त्यामुळे म्हादई वाचविण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ सायंकाळी शाह यांना भेटणार

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे मंत्रीमंडळातील पंतप्रधान मोदी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यामुळेच गोव्याची अस्मिता असलेल्या म्हादई नदीचा प्रश्न राज्यातील नेत्यांनी शाह यांच्या कानावर घातल्यावर शाह काय भूमिका घेतात, याकडे गोव्यासह कर्नाटकचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT