Operation Sindoor video Dainik Gomantak
गोवा

Operation Sindoor: भारतीय सेनेने कसं केलं लष्कर-ए-तैयबाचं पहिलं टार्गेट उद्ध्वस्त? Watch Video

Lashkar-e-Taiba air strike Pakistan: भारतीय लष्कराच्या कारवाईत कोटली परिसरातील 'अब्बास टेररिस्ट कॅम्प' पूर्णपणे नष्ट केला

Akshata Chhatre

भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरून गेलाय. एका रात्रीत केलेल्या या हल्ल्यात भारतीय सैन्याने नऊ जागांवरील दहशदवादी ठिकाणं उद्ध्वस्त करून पाकिस्तानला साळो की पळो केलंय.

भारतीय लष्कराच्या कारवाईत कोटली परिसरातील 'अब्बास टेररिस्ट कॅम्प' पूर्णपणे नष्ट केला. नियंत्रण रेषेपासून केवळ १३ कि.मी. अंतरावर असलेल्या या छावणीत लष्कर-ए-तैयबाचे आत्मघातकी दहशतवादी तयार केले जात होते. हा कॅम्प ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचे मुख्य प्रशिक्षण केंद्र होते.

अनेक वर्षे भारताविरुद्ध कटकारस्थाने रचणाऱ्या या अड्ड्यावर निशाण साधून भारतीय सुरक्षा दलांनी निर्णायक ठिकाणी आघात केलेला आहेत. या कारवाईने भारताच्या शत्रूंना स्पष्ट संदेश दिला दहशतवाद्यांना कुठेही लपण्याची जागा उरलेली नाही. देशाच्या सुरक्षेसाठी ही मोठी कामगिरी ठरली.

'माझ्या परिवाराला जन्नत नसीब झाली'

या हल्यात पाकिस्तानची मोठी हानी झालीये. आतंकवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि त्याच्या कुटुंबातील 14 जणांचा भारताकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये मृत्यू झालाय. यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया आली. तो म्हणाला की, 'या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते.'

या हल्ल्यात मसूदची पत्नी, मुलगी आणि भाऊ देखील होते अशी माहिती समोर आलीये. याशिवाय, मसूद अझहरचा भाऊ रौफ अझहरही मारला गेला आहे.

भारतीय लष्कराने बहावलपूरमधील दहशतवादी मसूद अझहरच्या मदरशाला टार्गेट केले आणि यातच अजहरचा परिवार उद्ध्वस्त झालाय.

बहावलपूरमधील या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, ज्यामध्ये संपूर्ण संकुल उद्ध्वस्त झाले. या मदरशाचे नाव मरकज सुभानअल्लाह होते. हे संकुल जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय होते. बहावलपूरमधील हा मदरसा जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि इतर अनेक दहशतवाद्यांचेही घर होते. गेल्या तीन दशकांपासून या मदरशात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरु आहेत अशी माहिती समोर आलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

SCROLL FOR NEXT