पणजी: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये घुसून लष्करी कारवाई केली. भारताच्या या धडक कारवाईने पाकड्यांचा तिळपापड झाला. त्यानंतर त्यानेही भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर तणाव वाढत गेला. मात्र अमेरिकेने मध्यस्थी करुन दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी घडवून आणली. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव काहीसा शांत झाला. दुसरीकडे, गोव्यासह देशाने पाकड्यांच्या हल्ल्यांचा निषेध केला. गोव्यात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत सरकारला पाठिंबा दिला. याच पार्श्वभूमीवर आता गोव्यात भाजपने तिरंगा रॅली काढत गोव्यातील लोक आणि देश भारत सरकारच्या पाठिशी असल्याचा स्पष्ट संदेश दिला.
गोवा भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत राज्याचे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले. गोव्यातील लोक आणि देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराच्या पाठिशी असल्याचे रॅलीदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करुन भारताने संपूर्ण जगाला एक मजबूत संदेश दिल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे म्हणाले.
तिरंगा रॅलीदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, ''आम्ही भारतीय लष्कराच्या समर्थानार्थ तिरंगा रॅली काढली आहे. गोव्यातील (Goa) लोक आणि देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराच्या पूर्णपणे पाठिशी आहे. तसेच, दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार आहे. आपल्याला आता पाकव्याप्त काश्मीर परत घ्यायचा आहे.''
तिरंगा रॅलीदरम्यान पर्यटनमंत्री रोहन खवंटे म्हणाले की, ''पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उडवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अशी कारवाई करत संपूर्ण जगाला एक मजबूत संदेश दिला. पाकिस्तान (Pakistan) दहशतवाद्यांना कसा छुपा पाठिंबा देतो हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिले.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.