Har Ghar Tiranga Rally: म्हापसा, नावेली येथे तिरंगा रॅली उत्साहात; तरुणांचा लक्षणीय सहभाग

Goa Har Ghar Tiranga Rally: पंधरा ऑगस्टपर्यंत गोव्यात विविध उपक्रमांचे आयोजन
Goa Har Ghar Tiranga Rally: पंधरा ऑगस्टपर्यंत गोव्यात विविध उपक्रमांचे आयोजन
Har Ghar Tiranga RallyDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी म्हापसा शहरात दुचाकीला तिरंगा लावून रॅली काढली. या रॅलीत युवकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी डिसोझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात ११ ते १५ ऑगस्टपर्यंत तिरंगा रॅली काढून विकसित भारतचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे, त्यानुसार ही रॅली काढण्यात आली आहे, असे सांगितले. डिसोझा यांनी यावेळी अग्निशामक दलाच्या कार्याबद्दल कौतुक केले.

भाजप गटाध्यक्ष सुशांत हरमलकर यांनी स्वागत केले. यावेळी हनुमंत वारंग, यशवंत गवंडळकर, योगेश खेडेकर, तन्वेश केणी, विकास महाले आदी उपस्थित होते.

नावेलीत तिरंगा यात्रेला उत्तम प्रतिसाद

नावेली भाजयुमोतर्फे नावेली मतदारसंघात तिरंगा यात्रा करण्यात आली. यावेळी आमदार उल्हास तुयेकर, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष समीर मांद्रेकर, भाजपचे राज्य सचिव सर्वानंद भगत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मारुती मंदिर, रुमडामळ, दवर्ली, आके बायश, नावेली अशी ही यात्रा काढण्यात आली. दवर्ली दिकरपालचे सरपंच साईश राजाध्यक्ष, आके बायशचे माजी सरपंच व पंच अविनाश सरदेसाई, भाजयुमो नावेलीचे अध्यक्ष व पंच विजय सुरमे, भाजपच्या नावेली मंडळाचे सरचिटणीस प्रमोद प्रभू व इतर कार्यकर्ते यांनी यात्रेत भाग घेतला.

या यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला. मंडळातर्फे तीन दिवस विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com