PM Modi
PM ModiDainik Gomantak

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे.
Published on

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. काल देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दरम्यान, गोव्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातून काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसनं देशात केवळ तुष्टीकरणाचं राजकारण केल्याचा घणाघात यावेळी पंतप्रधान मोदींनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांकवाळ येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर शरसंधान साधले. गोव्यातील दोन्ही जागा पुन्हा विक्रमी मताधिक्याने जिंकण्याचा भाजपचा मानस त्यांनी व्यक्त केला. भाजपने पुन्हा एकदा उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली आहे तर दक्षिण गोव्यात भाजपने पल्लवी धेंपे यांनी उमेदवारी दिली आहे.

PM Modi
Pramod Sawant Birthday: PM मोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, सावंतांनी जनतेकडे काय मागितले बर्थडे गिफ्ट?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या दोन्ही टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या बाबतीत सकारात्मक संकेत मिळत आहेत. गोव्याची ही भूमी भारत भक्तीची भूमी आहे. गोव्यातील मंदिरं जेवढी सुंदर आहेत तेवढी चर्चही आहेत. एक भारत श्रेष्ठ भारतची चित्र गोव्यात दिसते. ही निवडणुक दोन विचारधारांची आहे. एक विचारधारा ही भाजपप्रणित एनडीएची आहे, जी भारताच्या विकासासाठी काम करत आहे. तर दुसरी विचारधारा काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची आहे, जी तुष्टीकरणाची आहे. एनडीएच्या विचारधारेमधून 'सबका साथ सबका विकास'ची झलक मिळते.''

PM Modi
CM Pramod Sawant: प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक करा; काँग्रेसनंतर आता आपची मागणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय म्हणाले?

रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांना गोव्यातील लोक घराचा रस्ता दाखतील. गोमन्तकीयांच्या कष्टाचे पैसे रामाकांत खलपांनी लुटले. खलपांनी राज्यातील साडेतीन लाख लोकांचे पैसे लुटले. काँग्रेसच्या काळातच घोटाळा झाल्याचे त्यांनीच मान्य केलंय, असे सावंत म्हणाले. दोबाळी विमानतळावर राजकारण करण्याची गरज नाही, दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनच सुरु राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. एसटी आरक्षण, ओसीआय कार्डच्या समस्या मोदींच्या काळात सोडविण्यात आल्या, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. काँग्रेसने आजवर जातीचे राजकारण केले, उलट मोदींनी सर्वांना एकत्र घेऊन विकासाचे राजकारण केल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com