IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

Joe Root Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा आणि महत्त्वाचा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जाईल.
Joe Root Record
Joe RootDainik Gomantak
Published on
Updated on

Joe Root Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा आणि महत्त्वाचा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटला एक शानदार विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. रुट या मैदानावर 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनू शकतो. हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी रुटला या सामन्यात फक्त 22 धावांची गरज आहे.

मँचेस्टरमध्ये जो रुटची आकडेवारी जबरदस्त

मँचेस्टरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत जो रुटचे (Joe Root) नाव अव्वल स्थानी आहे. या मैदानावर त्याने आतापर्यंत 11 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 65.20 च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याच्या नावावर एक शतक आणि 7 अर्धशतके आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर डेनिस कॉम्प्टनचे नाव आहे, ज्याने 8 सामन्यांमध्ये 81.80 च्या सरासरीने 818 धावा केल्या आहेत.

Joe Root Record
IND vs ENG 4th Test: केएल राहुलच्या निशाण्यावर मोठे रेकॉर्ड, सचिन आणि गावस्कर यांच्या 'खास क्लब'मध्ये होणार एंट्री!

दरम्यान, या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मायकल एथर्टनचे नाव आहे. एथर्टनने मँचेस्टरमध्ये 10 सामन्यांमध्ये 40.50 च्या सरासरीने 729 धावा केल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर ॲलेक स्टीवर्टचे नाव आहे, ज्याने 9 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 58.66 च्या सरासरीने 704 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा (England) लिओनार्ड हटन आहे, ज्याने 9 सामन्यांमध्ये 50.07 च्या सरासरीने 701 धावा केल्या आहेत.

जो रुट सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो या सामन्यात सहज 22 धावा करुन हा विक्रम आपल्या नावावर करेल असे वाटत आहे.

Joe Root Record
IND vs ENG 4th Test: इंग्लंडमध्ये जस्सी बनणार किंग! 'हॅटट्रिक'सह बुमराह रचणार नवा रेकॉर्ड; दिग्गजाला सोडणार मागे

मँचेस्टरमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज:

  • 978 धावा - जो रुट (इंग्लंड)

  • 818 धावा - डेनिस कॉम्प्टन (इंग्लंड)

  • 729 धावा - मायकल एथर्टन (इंग्लंड)

  • 704 धावा - ॲलेक स्टीवर्ट (इंग्लंड)

  • 701 धावा - लिओनार्ड हटन (इंग्लंड)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com