Ravi Naik|Ponda|5 TPD of waste treatment plant Dainik Gomantak
गोवा

Waste Treatment Plant: ‘स्वच्छ सुंदर फोंडा’चा नारा! ५ टीपीडी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ

Curti Khandepar Panchayat: कुर्टी - खांडेपार पंचायतीतर्फे फोंडा पालिकेच्या सहकार्याने कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ रवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : फोंडा मतदारसंघाला जे चांगले ते सातत्याने देण्याचा प्रयत्न केला आहे. कुर्टी आणि फोंडा शहराची स्वच्छता आणि सुंदरता अबाधित ठेवण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून पुढील काळात फोंड्यातील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल, असे फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

केरये - खांडेपार येथे आज (शुक्रवारी) कुर्टी - खांडेपार पंचायतीतर्फे फोंडा पालिकेच्या सहकार्याने ५ टीपीडी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ रवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक,

नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक रूपक देसाई तसेच कुर्टी - खांडेपारचे सरपंच हरेश नाईक, उपसरपंच साजिदा सय्यद, पंचसदस्य नीळकंठ नाईक, अभिजीत गावडे, मनिष नाईक, नावेद तहसीलदार तसेच इतर पंचसदस्य पालिका मुख्याधिकारी योगिराज गोसावी, अभियंता विशांत नाईक पालिकेचे इतर कर्मचारी तसेच कुर्टी - खांडेपार पंचायतीचे सचिव सचिन नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

रवी नाईक म्हणाले की, फोंडा आणि कुर्टी भागात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे, या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आवश्‍यकता असून स्वच्छ आणि सुंदरता याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. अशा प्रकल्पांना नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक असून नागरिक ते देतील, असा विश्‍वास रवी नाईक यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष आनंद नाईक म्हणाले की, फोंडा मतदारसंघातील कचरा समस्या निकाली काढण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. फोंडा शहरासह कुर्टी व इतर भाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कृषीमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम हाती घेतले आणि ते यशस्वी करून दाखवले आहेत.

सरपंच हरेश नाईक म्हणाले की, कुर्टी - खांडेपार पंचायतीतर्फे पालिकेच्या सहकार्याने हा कचरा प्रक्रिया प्रकल्प साकारत आहे. योगिराज गोसावी यांनी स्वागत करताना कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या दूर होणार असल्याचे सांगितले.

माजी नगराध्यक्षांकडून सातत्याने प्रयत्न!

केरये येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कार्यान्वितीसाठी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रितेश नाईक यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. कृषीमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम पुढे नेण्यात आले आणि आता ते सुरूही झाले आहे. यापूर्वीचे साडेसहा टीपीडी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम आणि आता ५ टीपीडी प्रकल्पामुळे एकूण ११.५ टीपीडी प्रकल्प फोंडा मतदारसंघासाठी कार्यरत होणार आहे. एकूण २ कोटी ६० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याची हमी देण्यात आली आहे.

वीज निर्मितीचा होणार प्रयत्न

येथील एकूण ११.५ टीपीडी प्रकल्पातून वीज निर्मितीचा प्रयत्न होणार आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी वीजपुरवठा करण्याबरोबरच वीज बचतीचा प्रयत्नही या प्रकल्पातून होणार आहे. दुहेरी वापराच्या या प्रकल्पाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून शक्य तेवढ्या लवकर हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस आमदारांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

SCROLL FOR NEXT