Ravi Naik: प्रत्येकाने देशातील जातिधर्मातील वाद थांबवावा; कृषिमंत्री नाईक

Independence Day 2024: फोंड्यातील क्रांती मैदानावर देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला, यावेळी रवी नाईक यांनी ध्वजारोहण केले
Independence Day 2024: फोंड्यातील क्रांती मैदानावर देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला, यावेळी रवी नाईक यांनी ध्वजारोहण केले
Goa Independence Day | Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: आपला देश अखंड आहे, परकीय शक्ती देशाला कोणतीही बाधा आणू शकत नाही, प्रत्येकाने देशातील जातिधर्मातील वाद थांबवावा,असे सांगताना बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचार थांबवण्याची आज गरज असल्याचे स्पष्ट मत कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केले.

फोंड्यातील क्रांती मैदानावर देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी रवी नाईक यांनी ध्वजारोहण केले व पोलिसांकडून मानवंदना स्वीकारला.

रवी नाईक म्हणाले की, देशाची अखंडता भंग करू पाहण्याचे प्रयत्न होत आहेत, हे प्रयत्न आपण संघटित राहून हाणून पाडले पाहिजेत. आपल्यातील सांघिक भावना मोडीत काढून जाती धर्माच्या नावावर राजकारण करण्याचे प्रकारही चालले आहेत. अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे अशा प्रकारांना आणि अफवांना भीक न घालता सर्व जणांनी संघटित राहून देशाची अखंडता अधिक बळकट करुया असे आवाहन रवी नाईक यांनी केले.

जाती धर्माच्या नावावर फूट घालू पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची गरज आहे. आपला देश आत विकसीत होत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार योग्य प्रकारे काम करीत असून सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. शैक्षणिक, आरोग्य तसेच औद्योगिक क्षेत्रात क्रांती होत आहे.

नवनवीन साधनसुविधा उभारल्या जात आहेत. लोकांना चांगले ते देण्याचा सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत असून या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करायला हवे असे सांगताना आपल्यात कायम एकजूट राखूया आणि देशाची अखंडता अबाधित ठेवूया, असे रवी नाईक म्हणाले.

सूत्रसंचालन गिरिश वेळगेकर यांनी केले. जसविंदर सिंग तसेच फोंडा नगराध्यक्ष आनंद नाईक व सरकारी अधिकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Independence Day 2024: फोंड्यातील क्रांती मैदानावर देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला, यावेळी रवी नाईक यांनी ध्वजारोहण केले
Independence Day 2024: देशाच्या प्रगतीत सकारात्मक योगदान द्या; कर्नल सुमन कुमारी यांचे आवाहन

अत्याचाराचा निषेध!

बांगला देशात सध्या हिंदुवरील अत्याचार होत असल्याने त्याचा निषेध करीत कृषिमंत्री रवी नाईक म्हणाले, बांगला देशातील हिंदूंचे रक्षण करण्याची आज पाळी आली आहे. आपल्या देशात धार्मिक तेढ कधीच नव्हती, काही विघ्नसंतोषी लोकांकडून मात्र धर्मीय तेढ पसरवण्याचे प्रयत्न झाले, ते आपण सातत्याने हाणून पाडत आलो आहोत. बांगला देशात सध्या अराजक निर्माण झाले असून हिंदूंचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी असून सर्वांनी त्यासाठी सहकार्य करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com