Gas Cylinder Dainik Gomantak
गोवा

Gas Cylinder : कुठ्ठाळी भागात घरगुती गॅस सिलिंडरची खुलेआम विक्री

Gas Cylinder : एचपी किंवा भारत गॅसच्या अधिकृत डिलरना डावलून हा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे जाणवते.

गोमन्तक डिजिटल टीम

Gas Cylinder : कुठ्ठाळी, वेर्णा, पिर्णी व झुआरीनगर येथील सुपर मार्केट, मेटल मार्ट, जनरल स्टोअर, गिफ्ट सेंटरसारख्या दुकानांमध्ये सध्या खुलेआम घरगुती गॅस सिलिंडरची विक्री होत आहे.

या दुकानमालकानी संबंधित कंपन्यांकडून मान्यता न घेता हा काळा बाजार चालवलेला आहे. यामध्ये पाच किलोचा सिलिंडर ५८० रुपये, १४ किलोचा सिलिंडर १२०० रुपये तर व्यावसायिक १९ किलोचा सिलिंडर १८०० रुपये दराने विकले जातात. एचपी किंवा भारत गॅसच्या अधिकृत डिलरना डावलून हा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे जाणवते.

याबाबत येथील अधिकृत गॅस डिलरकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या गैरप्रकारास दुजोरा दिला असून याबाबत आपण संबंधित सेल्स ऑफिसरकडे संबंधित गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराबाबत रितसर तक्रार केली असल्याचे सांगितले.

कुठ्ठाळीमध्ये अशा प्रकारेच गॅस सिलिंडरची अनधिकृत गाडी घेऊन येऊन खुलेआम विक्री केली जाते. संबंधित सरकारी यंत्रणेने याबाबतीत त्वरित कारवाई करण्याची गरज आहे, तसेच वेर्णा पोलिसांनी या गैरप्रकाराला आळा घालावा.

जे लोक बेकायदेशीरपणे वास्तव्य करून गोव्यात राहतात ते अशा सिलिंडरची जास्त खरेदी करतात. त्यांच्यावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT