CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: साखळी पालिकेतील दुकाने खुली करा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत: आमदार कार्यालयाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: पालिका इमारतीत असलेली सर्व दुकाने खुली करावी. या इमारतीत विविध कार्यालये व अस्थापने सुरू झाल्यास व्यवसाय वाढेल, यातून नगरपालिकेने महसूलही प्राप्त होईल, असे मत आवाहन यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळीच्या आमदाराला साखळी शहरात अधिकृतपणे कार्यालय असावे, यासाठी नगराध्यक्ष रश्मी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी नगरपालिकेने ठराव घेतला होता.

त्याची अंमलबजावणी करताना पालिका इमारतीत पहिल्या मजल्यावर साकारण्यात आलेल्या आमदार कार्यालयाचे मंगळवार 14 रोजी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक यशवंत माडकर, निकीता नाईक, सिध्दी प्रभू, प्रवीण ब्लेगन, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, दयानंद बोर्येकर, दिपा जल्मी, अंजना कामत, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर व इतरांची उपस्थिती होती.

पुढील 50 वर्षे साखळी मतदारसंघातून निवडून येणारे आमदार या कार्यालयाचा लाभ घेतील. सरकारही आज त्याचप्रमाणे कार्य करीत असून दूरदृष्टी ठेवून विकास योजना राबविण्यात येत आहेत. पण या कार्यालयात महिन्यातून दोन वेळा उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण आपले कार्यालय लोकांच्या सेवेसाठी कायम खुले राहणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सूत्रसंचालन नगरसेविका सिध्दी प्रभू यांनी केले तर आभार मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी मानले.

भिवपाची गरज ना!

साखळी नगरपालिकेत आमदाराचे कार्यालय असावे, ही सर्वांचीच इच्छा होती. साखळीचे आमदार मुख्यमंत्री असल्याचा आम्हांला अभिमान आहे. आता मुख्यमंत्र्यांचेच अधिकृत कार्यालय नगरपालिकेत आल्याने साखळी नगरपालिकेला ‘भिवपाची गरज ना’. साखळीतील विकासकामांना मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने गती मिळाली आहे. आता या कामांवर त्यांचेही लक्ष राहणार, असे यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT