Open gambling on terrace of house Dainik Gomantak
गोवा

करंझाळेत घराच्या गच्चीवर खुलेआम जुगार

करंझाळे येथे छापा; 25 जणांना अटक

दैनिक गोमन्तक

पणजी: टोंक-करंझाळे येथे एका घराच्या गच्चीवर दिवसाढवळ्या सुरू असलेल्या पोकर गेम्स जुगारावर आज पणजी पोलिसांनी छापा टाकून 25 जणांना अटक केली. तसेच जुगारासाठी वापरण्यात आलेल्या 883 पोकर चिप्स, कार्डस्‌ तसेच 20,590 रोकड जप्त केली आहे. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली संशयितांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंझाळे येथील एका घराच्या गच्चीवर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व त्या आधारे त्‍यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा घेऊन तेथे छापा टाकला.

हे घर गोवा इंटरनॅशनल हॉटेलच्या मागील बाजूला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शलत सुगाथन (बांबोळी), प्रतीक वळवईकर (जुने गोवे), चेतन सोळंकी (पर्वरी), जयेश लखानी (दोनापावला), निकेश पौदर (मेरशी), मोहम्मद कुरेशी (भाटले), गोकुळ भट (करंझाळे), जसजीत सिंग ग्रोव्हर (ताळगाव), क्लिंटन तावारीस (रायबंदर), गौतम फडते (बेती), योगेश लोटलीकर (शिरदोण), अजिंक्य कोरगावकर (वेरे), आल्बिनो परेरा (मेरशी), मोहम्मद मुल्ला (उसगाव-तिस्क), कवलजित सिंग (चिखली), विशाल शेटीगर (म्हापसा), सिद्धू मडिवाल (शिरोडा), मिथुन आरोंदेकर (भाटले), फ्रान्‍सिस डिसोझा (साळगाव), वेलेंटे डिकुन्हा (टोंक-करंझाळे), एडविन रॉड्रिग्स (सांताक्रुझ), रजत कांदोळकर (माशेल), मोहित बिस्त (शिरोडा), सनी लखानी (दोनापावला) व ब्रिघटन रॉड्रिग्‍स (सांताक्रुझ) यांचा समावेश आहे.

पोलिस निरीक्षक अमीर तरल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये हरिनाम नाईक, नितीन गावकर, विकास नाईक, इर्मिय्या गुर्रैय्या, आदित्य म्हार्दोळकर, सयेश उस्कैकर, श्रीपाद नाईक, प्रसन्न मंगेशकर, रामा घाडी, हिरू नाईक व निखिल यांचा समावेश होता. महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

Goa Third District: नवा तिसरा जिल्हा आणि मुख्यालय; काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार का मानले? काँग्रेस आमदाराचा सवाल

Operation Sindoor: 'सैनिकांच्या शौर्यासाठी टाळ्या वाजवण्यास नकार..? राहुल गांधींवर उठली टीकेची झोड; संरक्षणमंत्र्यांच्या आवाहनानंतर नवा वाद

Goa Assembly Live: ज्या डिलिव्हरी बॉईजची बाईक गोव्यात नोंदणीकृत नाही; त्याचीही पडताळणी करा, दिलायला लोबो यांची मागणी

IND vs ENG: सर जडेजा पुन्हा रचणार इतिहास! व्हीव्हीएस लक्ष्मणचा रेकॉर्ड निशाण्यावर; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

SCROLL FOR NEXT