OPA Water Treatment Plant Gomantak Digital Team
गोवा

Ponda News : ओपा जल प्रकल्पाची भिस्त बंधाऱ्यांवर!

शिगणेव्हाळ बंधारा केला खुला

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : सबंध फोंडा तालुका व तिसवाडी तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ओपा जल प्रकल्पाची पाण्याची पातळी घसरत असल्याने चिंतेची बाब ठरली आहे. जलस्त्रोत खात्यातर्फे पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मिळाला आहे.

ओपा जल प्रकल्पाला गांजे प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने अखेर शिगणेव्हाळ येथील बंधारा ओपासाठी सोडणे आवश्‍यक ठरले. जलस्रोत खात्याने शिगणेव्हाळ येथील बंधारा खुला केल्याने आता ओपा जल प्रकल्पाची पाण्याची पातळी वाढली आहे. काल गुरुवारी ओपाच्या पाण्याची पातळी २.९० मिटर होती ती आता ३ मीटरच्या पुढे गेली आहे. पाण्याची पातळी व्यवस्थित राखली जात असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ओपा जल प्रकल्पातून फोंडा तसेच तिसवाडी तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो. मात्र दिवसेंदिवस पाण्याची गरज वाढत असल्याने पाणीपुरवठा अपुरा पडतो. गांजे प्रकल्पातून ओपासाठी ७० एमएलडी पाणी सोडले जाते, पण तांत्रिक कारणामुळे गांजेचे पाणी ओपाला सोडले जात नाही, त्यामुळेच पाण्याची पातळी घसरली असल्याचे समजते.

ओकांब बंधाऱ्याचे पाणी ओपात

पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी चार दिवसांपूर्वी ओकांब येथील बंधाऱ्याचे पाणी ओपासाठी सोडण्यात आले होते, तर आता शिगणेव्हाळ बंधाऱ्याचे पाणी सोडले आहे. साळावलीचे पाणी दरवर्षीप्रमाणे ओपासाठी सोडण्यात आले आहे, पण ते टप्प्याटप्प्याने पोचत असल्याने सध्या तरी बंधाऱ्याच्या पाण्यावर भिस्त ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT