Goa Mopa International Airport Water Issue: पेडणे तालुक्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयुष हॉस्पिटल आणि तुये येथे होऊ घातलेला इलेक्ट्रॉनिक्स सिटी प्रकल्प हे प्रकल्प पाण्याची सोय करण्यापूर्वीच उभारले आहेत.
त्यात मोपा विमानतळ आणि आयुष हॉस्पिटल पूर्ण झालेला आहे. मात्र, चांदेल प्रकल्पातील पाण्याचा घरगुती ग्राहकांना योग्यरीत्या पुरवठा होत नसल्याने सध्या नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
याबाबत दोन्ही लोकप्रतिनिधी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आपल्या पद्धतीने पाणीपुरवठा अधिकारी आणि चांदेल पाणी प्रकल्पाला भेट देऊन पाणी सुरळीत करण्याची वारंवार मागणी करत आहेत.
परंतु पाण्याची क्षमता आजपर्यंत वाढविली गेली नसल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करताना मोठ्या अडचणी येत आहेत.
प्रकल्पाकडे दुर्लक्ष
पेडणे तालुक्यातील जनतेला चांदेल येथील 15 एमएलडी पाणी प्रकल्प आजपर्यंत अपुरा ठरत आहे. या पाण्याच्या प्रकल्पाचा विस्तार करताना दुर्लक्ष झाल्यामुळे आता जनतेचे पाणी इतर प्रकल्पांकडे वळविले जात आहे.
त्यामुळे या चांदेल पाणी प्रकल्पातून येणारे पाणी जनतेला व्यवस्थित मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारने जनतेला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची गरज होती. परंतु सरकारने चांदेल पाणी प्रकल्पाच्या विस्ताराला योग्य ती दिशा न दिल्यामुळे आणि पाणीपुरवठा करत असताना कुठेतरी गफलत होत असल्यामुळे पाणी कुठे मुरते याचा अधिकाऱ्यांनी तपास करायला हवा.
नीलेश कांदोळकर, तुयेचे माजी सरपंच तथा उपसरपंच
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.