Goa Water Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: ‘ओपा’ची जलवाहिनी फुटली; तिसवाडीला कमी दाबाने पुरवठा

Goa Water Issue: ओपा येथून तिसवाडीत पाणी पुरवठा करणारी 750एमएम व्यासाची जलवाहिनी सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फुटली.

दैनिक गोमन्तक

Goa Water Issue: ओपा येथून तिसवाडीत पाणी पुरवठा करणारी 750एमएम व्यासाची जलवाहिनी सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फुटली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हे दुरुस्तीचे काम हाती घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता निवृत्ती पार्सेकर यांनी दिली.

खांडेपार नदीवर असलेल्या ओपा येथील जलपुरवठा केंद्रातून तिसवाडी तालुका परिसरासाठी ७५० एमएम व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी आणले जाते. कास्ट आयर्नच्या वाहिन्या असून, अधून-मधून या वाहिन्या फुटण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास वाहिनी फुटल्यानंतर त्या वाहिनीतून लाखो लिटर पाणी वाहून गेले.

ओपा केंद्रावरील साबांखा कामगारांना माहिती मिळताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर जेसीबीच्या साह्याने वाहिनी जोडण्याचे काम करण्यात आले.

दरम्यान, जलवाहिनी फुटल्यामुळे तिसवाडी तालुक्यातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार असून, तिसवाडी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT